25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeChiplunमहामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी - गणेशोत्सवात निर्बंध

महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी – गणेशोत्सवात निर्बंध

मुंबई ते सावंतवाडीदरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजनक्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्ग विविध दिवशी तब्बल २१६ तास बंद असणार आहे. या कालाधीत फक्त अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक करता येण्यास मज्जाव केला आहे. अवजड वाहनांना बंदी घातली असताना दुसरीकडे मात्र रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने गणेशभक्तांचा प्रवास खडतर असणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सरकारने सूट दिली आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजनक्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील मुंबई ते सावंतवाडीदरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

असे राहील वेळापत्रक – गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२पासून ते ८ सप्टेंबरला रात्री ११ पर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासासाठी ११ सप्टेंबरला रात्री ८पासून ते १३ सप्टेंबरला रात्री ११पर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबरला सकाळी ८ पासून ते १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील. या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधीव्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११पासून ते ११ सप्टेंबरला सकाळी ८ वा. आणि १३ सप्टेंबरला रात्री ११ पासून ते १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यानंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.

RELATED ARTICLES

Most Popular