26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeRatnagiriभाट्ये समुद्रकिनारा झाला चकाचक

भाट्ये समुद्रकिनारा झाला चकाचक

२३ किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

जागतिक महासागर दिनानिमित्त भू विज्ञान मंत्रालय भारत सरकार, भारतीय समुद्र संस्था (कोची) यांच्या सहकायनि भारतातील निवडक २३ किनारपट्टी स्थळांवर आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने भाट्ये समुद्रकिनारा या अभियानांतर्गत स्वच्छ करून आपले योगदान दिले. अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वरिष्ठ महाविद्यालयातील नौदल व भूदल छात्रसेना विद्यार्थी असे ७० विद्यार्थी स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी झाले. जगभरातील महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, महासागर किनारा संरक्षण व संवर्धन यात सहभाग घेणे.

सागरी जीवरक्षण व पर्यावरण संतुलन अशा विविध उद्देशांनी ८ जून हा दिवस ‘महासागर दिन’ म्हणून साजरा केला जातो. भू विज्ञान मंत्रालय भारत सरकार, भारतीय समुद्र संस्थेच्या सहकार्याने २३ किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मानवनिर्मित प्रदूषणाला कमी करणे हे मानवाचेच काम आहे, याचे भान राखून अनेक स्वयंसेवक यात सहभागी झाले. प्लास्टिक, काच, धातूच्या वस्तू, अन्य कचरा याचे संकलन, मोजमाप, वर्गीकरण व योग्य पद्धतीने पुनर्प्रक्रिया व्यवस्थेकडे हस्तांतरण करण्यात आले.

भारतीय समुद्र संस्थेचे स्थानिक समन्वयक म्हणून डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी काम पहिले. प्रा. सचिन सनगरे, महेश सरदेसाई, प्रा. अरूण यादव, प्रा. स्वामिनाथन् भट्टार, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. स्मिता पाथरे यांनी सहभाग घेतला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व सहभागी स्वयंसेवक विद्यार्थी, नियोजनात सहभागी प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular