24 C
Ratnagiri
Wednesday, March 26, 2025

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

‘ते’ कंत्राटी शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना...

मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे ? सिव्हिल-वैद्यकीय महाविद्यालयात समन्वयाचा अभाव

जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन...
HomeKhedखेड अस्तान येथे रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

खेड अस्तान येथे रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

कामामुळे हा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील आंबवली विभागातील अस्तान धनगरवाडी मार्गावर सोमवार १० जून रोजी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या दरडीमुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप प्रशासनाकडून प्राप्त झाली नसून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. अस्तान गावातील धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली असून याठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील अस्तान परिसरात रस्त्याचे काम करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या कामामुळे हा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याचे बोलले जात आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून केवळ रस्त्यावर मातीचा ढिगारा आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा ढिगारा देखील अद्याप हटविण्यात आला नसून हा ढिगारा हटविताना वरून मोठ्या प्रमाणात माती घसरण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू असून खेड तालुका प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड तालुका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

RELATED ARTICLES

Most Popular