32.6 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeChiplunधामापूर शाखाप्रमुखांसह पदाधिकारी राष्ट्रवादीत आमदार निकमांच्या उपस्थितीत प्रवेश

धामापूर शाखाप्रमुखांसह पदाधिकारी राष्ट्रवादीत आमदार निकमांच्या उपस्थितीत प्रवेश

ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आम्ही आदेशावर काम करणारे कार्यकर्ते असून, आमदार शेखर निकम यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले आहे. यापुढे तुमचा शब्द हाच आमच्यासाठी आदेश असेल, असे सांगत धामापूर जिल्हा परिषद गटातील शाखाप्रमुख, सरपंच, उपशाखाप्रमुख व शिवसैनिकांनी आमदार निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धामापूर जिल्हा परिषद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आमदार निकम यांच्या उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, राष्ट्रवादीचे नेते राजू सुर्वे, ज्येष्ठ नेते दादा साळवी, जयंद्रथ खताते, सुशील भायजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

स्वतःच्या खिशाला चाट देऊन कित्येक वर्षे आम्ही पक्षाचे काम करत आहोत. नेत्याचा शब्द हाच आमच्यासाठी आदेश मानून काम सुरू होते; मात्र आमदार निकम यांनी कोणतेही राजकारण न करता आमच्या विभागासाठी तब्बल ७० कोटींचा निधी देऊन वाडीवस्तीवर विकासकामे केल्याचे धामापूर शाखाप्रमुख तुकाराम मेस्त्री यांनी सांगितले. गावचा आणि विभागाचा विकास करणाऱ्या आमदार निकम यांना आम्ही खंबीर साथ देऊ, असा विश्वास माजी सरपंच दत्ताराम भायजे यांनी व्यक्त केला.

या वेळी धामापूर शाखाप्रमुख तुकाराम मेस्त्री, माजी सरपंच दत्ताराम भायजे, शाखाप्रमुख गंगाराम भायजे, पडयेवाडी गावकर संजय पडये, बालेवाडी गावकर मधुकर बोले, पडयेवाडी माजी अध्यक्ष नीलेश पडये, विजय पडये, भुसेवाडी महेंद्र कंबळे, रमेश भायजे, दिनेश पडये, रघुनाथ बोले, प्रकाश पवार, यशवंत पवार, विनोद भायजे, दत्ताराम बेंडके, तुकाराम बेडके, पुर्येतर्फे सावर्डे गावातील सरपंच विष्णू मांडवकर, शाखाप्रमुख शंकर घडशी, पेवेवाडी वाडीप्रमुख सहदेव पाडावे, गावकरवाडी वाडीप्रमुख यशवंत पाडावे, कलबुशी उपशाखाप्रमुख प्रमोद चव्हाण, दत्ताराम महापार्ले, रमेश पवार, सुरेश आंग्रे, प्रभाकर पवार, संदीप पवार, देवेंद्र चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी मंगळवारी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

RELATED ARTICLES

Most Popular