31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून, सर्वसामान्यांची...
HomeRajapurराजापूरच्या अर्जुना धरणात वाहन कोसळून २ कामगार ठार, ८ जखमी

राजापूरच्या अर्जुना धरणात वाहन कोसळून २ कामगार ठार, ८ जखमी

अर्जुना कॅनॉलमध्ये काम करणारे १० कामगार बुधवारी सायंकाळी तालुक्यातील करक अर्जुना डॅमवर कॅम्पर या चारचाकी पिकअप वाहनाने फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून त्यांचे वाहन उलटले आणि ३ ते ४ कोलांट्या खात सुमारे ४० ते ५० फूट खोल धरणक्षेत्रात कोसळले. या अपघातात २. कामगारांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एकाचे नाव सुहास कुमार (वय २८) तर दुसऱ्याचे नाव बनई (पूर्ण नाव नाही. वय २५) असे आहे. अन्य गंभीर जखमींना तत्काळ रायपाटण ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला कोल्हापुरात हलवण्यात आले. अन्य जखमींनाही गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रूग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. सूर्यकुमार बिन (बिहार), उकाश कोरे (सांगली), समरपाल कश्य (वय २९, मुरादाबाद, युपी), राहुल गणेश वाडे (वय ३३, मिरज), हिराकुमार बिन, लहुकुमार बिन, दीपककुमार बिन, मकसुदन अशी इतर जखमींची नावे आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच आजुबाजूच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप पावसाळा सुरू झालेला नाही. यामुळे धरणातील पाणीसाठा खूपच कमी आहे. यामुळे या अपघाताचे गांभिर्य टळले. अपघातग्रस्त वाहन पाणीसाठ्यापासून काही अंतर जाऊन थांबले. पावसाळ्यानंतर ४ ते ५ महिन्यात या भागात पाणीसाठा असतो. पाणीसाठा नसल्याने अन्य कामगार बचावले. मात्र २ कामगारांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी रायपाटण ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन जखमींवरील उपचाराची माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक उबाळे उपस्थित होते. गंभीर जखमींना जिल्हा रूग्णालयात हलवण्याच्या सूचना तहसीलदार श्रीमती जाधव यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular