31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriमत्स्यव्यवसाय प्रशिक्षणबाबत निवेदन

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणबाबत निवेदन

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत ०१ जुलै २०२१ पासून मच्छिमार तरुणांना ‘नौका नयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीज डीझेल इंजिनची देखभाल व निगा’ याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या ११७ व्या सत्राची सुरुवात रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. तरी खाली नमूद केल्याप्रमाणे अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी स्वत:च्या हस्ताक्षरातील आपले अर्ज ३० जुलै २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयाकडे पोहोचतील असे पाठवावे असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. विहीत नमुन्यातील छापील अर्ज या कार्यालयातून घेऊन जावा, तसेच मुदतीनंतर अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

उमेदवार मच्छिमार समाजातील अथवा ज्यांनी मच्छिमारी धंदा गेली काही वर्षे पासून अंगिकारला आहे. अशापैकी असावा व तसा अजुभव असल्याबदल तलाठी किंवा मच्छिमारी सहकारी संस्था अथवा मत्स्यव्यवसाय अधिकान्याचे शिफारसपत्र सोबत जोडावे (छायाप्रत). उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षाचे आत असावे. तसेच प्रकृतीले कणखर असणाऱ्या, मेहनतीचे काम करू शकणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. (जन्म तारखेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत). उमेदवाराची किमाण शैक्षणिक पात्रता चौथी पास असून त्याला उत्तम प्रकारे मराठी लिहिता व वाचता आले पाहिजे. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. (शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत). प्रत्यक्ष समुद्रावरील मासेमारीचा अनुभव असणे जरुरीचे आहे. पोहता येणे व समुद्रावर सफरीस गेल्यास सुस्थितीत राहू शकणे अत्यावश्यक. मच्छिमारी सहकारी संस्थेचे शिफारसपत्र व सभासद असल्याची पावती (झेरॉक्स प्रत) जोडणे.

ज्या उमेदवाराचा अर्ज परिपूर्ण असेल त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल, परिपूर्ण नसेल ते अर्ज दप्तरदाखल करण्यात येतील. अर्ज परत दिला जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारास या कार्यालयाशी एक करारनामा करावा लागेल. उमेदवारांनी स्वत:चा अर्ज मच्छिमारी संस्थेकडे नोंदवून नंतर या कार्यालयाकडे सादर करावा. रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनाच प्राधान्य राहिल. अन्य जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार मा. आयुक्त,मत्स्यव्यवसाय खाते, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे विचाराधीन राहील. (तलाठी/पोलीस पाटील/सरपंच यांचा रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.)

विशेष जाती जमातीकरिता एकूण २२ उमेदवारांपैकी २ जागा राखीव असून सदर उमेदवाराचे अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत पाठविण्यात यावेत. दारिद्रय रेषेखालील उमेदवारांस दरमहा रु. १००/- सेवाशुल्क (फी) व दारिद्रय रेषेवरील उमेदवारास दरमहा रू.४५०/- सेवाशुल्क(फी)भरावी लागेल. संस्थेने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास केंद्रातील त्याच्या गैरहजर, गैरवर्तण

इत्यादी बाबत योग्यवेळी दखल न घेतल्यास त्याचे प्रशिक्षण तात्काळ समाप्त केले जाईल. करिता संस्थेने पुरस्कृत करण्यापूर्वीच त्याची योग्यता पडताळून पहावी. निवड झालेल्या उमेदवारास सागरी जोखमीचे विमा संरक्षण घ्यावे लागेल. स्मार्टकार्ड किंवा स्मार्टकार्डसाठी केलेल्या अर्जाची झेरॉक्स आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular