21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeChiplunचिपळूणच्या सुनबाईना अयोध्येतील रामलल्लाचा पोशाख शिवण्याचा मान

चिपळूणच्या सुनबाईना अयोध्येतील रामलल्लाचा पोशाख शिवण्याचा मान

शिवसेनेचे पहिले आमदार बापू खेडेकर यांच्या सूनबाई सोनाली खेडेकर यांना पोशाख शिवण्याची संधी मिळाली.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी अयोध्येत अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येसह देशभरात ठिकठिकाणी श्रीरामांची मंदिरे सजवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर चिपळूणच्या सूनबाईंनी रामलल्लांचा पोषाख सजविला आहे. चिपळूण येथील शिवसेनेचे पहिले आमदार बापू खेडेकर यांच्या सूनबाई असलेल्या सोनाली खेडेकर यांना रामलल्लाचा पोशाख शिवण्याची संधी मिळाली आहे. हा पोशाख शिवून त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातर्फे रामलला देवस्थानकडे सुपूर्द केला आहे. पुणे येथील अनुराधाताई घैसास यांनी ‘दो धागे श्रीराम के नाम’ हा उपक्रम सुरू केला.

साडेबारा लाख लोकांनी दोन-दोन धागे विणून रामलल्लाच्या वस्त्रांसाठी तलम कापड विणले. १ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान लोकांनी या दो धागे श्रीराम के नाम या उपक्रमात सहभाग घेतला आणि २३ डिसेंबर रोजी अनुराधा घैसास यांनी रामलल्लांसाठी पोषाख तयार करण्याची जबाबदारी सोनाली यांच्यावर सोपवली. या संदर्भात सोनाली खेडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्याकडे हा प्रस्ताव आल्यावर आपल्याला धकाच बसला. रामलल्लांची मूर्ती कशी असणार, याबाबत काहीच माहिती नव्हती. मग पोषाख शिवणार कसा? हा प्रश्न होताच. त्यासाठी मूर्तिकार तज्ज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांच्याकडे जाऊन रामलल्लांच्या मूर्तीविषयी आणि पोषाख कसा असावा, याविषयी माहिती मिळवली.

रेशमी भरजरी वस्त्रे – रामलल्लाचा पोषाख तयार केला आणि आठ पोषाख तयार करून १६ जानेवारीला अनुराधाताई घैसास यांच्या ताब्यात दिले. त्यांनी हे पोषाख श्री राम जन्मभूमी देवस्थान न्यास यांच्याकडे सुपूर्द केले. तब्बल दोन दशकांचा डिझायनिंगमधील अनुभव असल्याने तो पणाला लावून पोषाख तयार केला. रेशमी वस्त्राचे उपरणे, सोवळे आणि अंगरखा आणि तीन कपड्यांचा सेट तयार करून एकूण आठ सेट तयार झाले. रंगसंगती, जरीचा काठ, कशिदाकारी, मोतीकाम करून ही वस्त्रे रामलल्लांच्या मूर्तीचे सौंदर्य अधिक कसे खुलवतील याचा प्रयत्न केला. हे काम करण्यासाठी आमच्या कारागिरांनी देखील मेहनत घेतली. यावेळी मोतीकाम करणारे सर्व कारागिर मुस्लीम असताना देखील त्यांनी आपले कर्म हीच पूजा मानून जीव ओतून काम केले आणि आम्हाला श्री रामलल्लांचा पोषाख शिवण्याचे भाग्य मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular