खेड शहरातील सांस्कृतिक चळवळीला उभारी देऊन नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेल्या कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृह पुनर्बाधणीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. साडेअकरा कोटी रुपये खर्चुन नव्याने दुरुस्ती करण्यात येत असलेल्या कामाची गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तिसऱ्यांदा पाहणी करत दर्जेदार अन् विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यामुळे तब्बल १९ वर्षानंतर नाट्यरसिकांचा वनवास संपुष्टात येणार आहे. यंदा नाट्यगृह खुले होण्याच्या शक्यतेने सांऱ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. सांस्कृतिक बळकटीसह चळवळीच्या शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेल्या कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा १९ वर्षांपासून बंदच आहे. हा पडदा उघडण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांच्या निधीचा चुराडाकरण्यात आला. लवकरच नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होईल, अशा करण्यात आलेल्या नानाविध घोषणा हवेतच विरून नाट्यरसिकांच्या आशेवर वर्षानुवर्षे पाणीच फेरले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांमी योगेश कदम आमदार असताना शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता साकडे घालत सतत पाठपुरावा केला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी साडेअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झात्ता प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम देखील सत्वरतेने हाती घेण्यात आल्याने साऱ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नातून साकारले नाट्यगृह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाट्यगृह दुरुस्ती कामाच्या पाहणीदरम्यान काम दर्जे दार अन् निर्धारित वेळेत करण्याबाबत नगर प्रशासनाला सूचना केल्या होत्या. यानंतर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला. केवळ सूचना करून न थांबता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नाट्यगृह दुरुस्ती कामाची सलग तिसऱ्यांदा पाहणी केली. याआधी सांस्कृतिक दालनाची मूळ संकल्पना अन् उभारणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या दूरदृष्टीतून साकारण्यात आली होती.
नाट्यगृहाची पुनर्बाधणी अन् सुशोभिकरणासाठी गृह राज्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळे कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृह नव्या रूपात उभे राहणार आहे. नाट्यगृहांचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या १९ वर्षांपासून रंगमंचाअभावी एकही नाटक सादर न झाल्याने येथील रसिक नाटकांचे भुकेलेलेच होते. नाट्यरसिकांची भूक येत्या काही दिवसातच भागणार असून सांस्कृतिक देखील दूर होणार आहे. नाट्यरसिकांचा १९ वर्षांपासूनचा वनवासही संपुष्टात येणार असून शहरवासीयांच्या सांस्कृतिक जीवनात नवे चैतन्यच निर्माण होणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खासगी सभागृहांचा आधार घेऊन सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक भुर्दंड मधून स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांची सुटका होणार आहे. नाट्यगृह दुरुस्तीचे काम पूर्ण होतेय कधी अन् १९ वर्षांपासून बंद असलेला नाट्यगृहाचा पडदा उघडतोय कधी? याचीच सारेजण वाट पाहत आहेत.