28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeRatnagiriकुणबी नोंदी ३.५ लाखांहून अधिक, सामंत यांनी काढला तोडगा

कुणबी नोंदी ३.५ लाखांहून अधिक, सामंत यांनी काढला तोडगा

जात पडताळणी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे पावणेदोनशेहून अधिक प्रस्ताव समितीने नाकारले आहेत.

जिल्ह्यांत मराठा-कुणबी नोंदी तपासताना जुन्या दस्तावेजांमध्ये तब्बल साडेतीन लाखांहून अधिक कुणबी समाजाच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे कुणबी समाज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे, याचा पुरावा तयार झाला आहे. नोंद असलेल्यापैकी कुणीही जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यास कोणतीही कागदपत्रे न तपासता निव्वळ त्या नोंदीच्या आधारे दाखला देता येईल. त्यासाठी नोंदी असलेल्या लोकांसाठी शिबिरांचे आयोजन करून संबंधितांना जात प्रमाणपत्र दिली जावीत, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

कुणबी समाजोन्नती संघाचे राजापूर तालुक्यातील ग्रामीण शाखेचे अध्यक्ष दीपक नागले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कुणबी दाखले, जात पडताळणी करण्यात येणाऱ्या अडचणी आणि पंतप्रधान आवास योजनेतील त्रुटींविषयी निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करत त्यावर तोडगा काढला आहे. तिल्लोरी कुणबी समाजाला कुणबी म्हणून दाखले मिळण्यात मागील वर्षापासून अडचणी येत आहेत.

जात पडताळणी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे पावणेदोनशेहून अधिक प्रस्ताव समितीने नाकारले आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. जिल्ह्यात मागील महिनाभरापासून १९१० पासून कुणबी-मराठा प्रमाणपत्रांसाठी आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक दस्ताऐवज तपासण्यात आले. त्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा ११९ नोंदी आढळल्या असून, कुणबी समाजाच्या तब्बल साडेतीन लाखांहून अधिक नोंदी आहेत. या नोंदी विचारात घेऊन कुणबी समाजाला दाखले देताना कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करू नये, असे त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular