26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriलसीकरणासाठी मोबाइल व्हॅन मोफत उपलब्ध

लसीकरणासाठी मोबाइल व्हॅन मोफत उपलब्ध

राजापूरचे कार्यतत्पर नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे ते अॅड. जमिर खलिफे. राजापूर मधील १०० टक्के जनतेला लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी नगराध्यक्ष हे कोरोनाची लस उपलब्ध झाल्यापासूनचं प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. राजापूर शहरामध्ये ८ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय लसीकरण करण्याचे योजिले असल्याचे नगराध्यक्ष खलिफे यांनी सांगितले आहे.

प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेसाठी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी त्यांच्या आणि त्यांच्या आई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सोमवारी मोबाइल व्हॅन मोफत उपलब्ध करून दिली आहे. या मोबाईल व्हॅन मधून लसीकरण करण्यात येणार असून त्याची चावी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे सुपुर्द केली आहे. लसीकरणासाठी जाणारे वैद्यकीय कर्मचारी तसेच लसीच्या डोसांची ने-आण करण्यासाठी लागणारी मोबाइल व्हॅन नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी राजापूर नगर पालिकेला मोफत  उपलब्ध करून दिली आहे.

लसीकरणासाठी लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याप्रमाणे प्रभागानुसार जेष्ठ नागरिकांपासून ते इतर जाणते पर्यंत अशा प्राधान्यक्रमाने दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे. कोरोना नियमांचे पालन करून, गर्दी न करता प्रभागानुसार लस घेण्यात यावी असे जनतेला स्पष्ट केले आहे. लसीचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्याने विनाकारण केंद्रावर गर्दी करून गोंधळ घालून कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करू नये.

या मोबाइल व्हॅन वितरण प्रसंगी माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे, भाजप नगरसेवक गोविंद चव्हाण, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर, आरोग्य विभागाच्या सौ. अनुष्का जुवेकर आणि मुख्य लिपिक जितेंद्र जाधव उपस्थित होतेत.

RELATED ARTICLES

Most Popular