27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriदुर्मिळ प्रजातीच्या कासवाला जीवनदान

दुर्मिळ प्रजातीच्या कासवाला जीवनदान

रत्नागिरीला लाभलेल्या स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टीवर कायमच पर्यटकांची गर्दी असते. लहान मोठ्या लागून सुट्ट्या आल्यात कि पर्यटकांचा कल जास्त करून कोकण आणि कोकण किनारपट्टीकडे फिरायला जाण्याकडे असतो. आणि मुंबई पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरामधून जीवाला उसंत मिळावी यासाठी पर्यटकांची पहिली पसंती ही कोकण चं असते. कोकणामध्ये समृद्ध किनारपट्टी लाभल्याने मासेखाऊ लोकांची चांगलीच चंगळ होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनार्यावर दुर्मिळ असे रिडले जातीचे भव्य आकाराचे कासव सापडले असून, हर्णे ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून त्या भव्य कासवाची सुटका केली आहे. सकाळी मुरुड समुद्र किनारी काही ग्रामस्थ किनारपट्टीची पाहणी करत फेरफटका मारत होतेत, तेंव्हा हे भव्य दिव्य कासव त्यांच्या नजरेस पडले. ते पुर्णपणे जाळ्यामध्ये गुरफटून गेलेलं होते. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या आधी अथवा नंतर या विणीच्या हंगामाला या ऑलीव्ह रिडले प्रजातीची अनेक मादी कासवे या समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. त्यासोबतच मंडणगड मधील वेळास, वेसवी गावामध्ये पण समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात या हंगामाला अंडी घालण्यासाठी येत असतात. वेळास गावी तर मागील काही वर्षे कासव पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जात होते. अनेक फोटोग्राफर , संशोधक, पर्यटक या महोत्सवामध्ये सहभागी होतात. अनेक फोटोग्राफर कासवांचे विविध फोटो टिपण्यासाठी आपले कॅमेरे सज्ज ठेवून कित्येक तास समुद्रकिनार्यावर घालवत असत.

मुरुड किनारी सापडलेल्या या कासवाची जाळ्यातून वेळीच सुटका करून, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्या शिवगण, तसेच त्यांचे सहकारी साळवी, कापडी, जाधव यांनी सुरी आणून सर्व जाळे कापून कासवाला जीवनदान दिले. काहीवेळा अशी समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात गुरफटलेली कासवे वेळीच मदत न मिळाल्याने जाळी गळ्याभोवती गुंफून मरतात तरी अथवा त्या दोर्याच्या धारेने जखमी अवस्थेत सापडतात. ग्रामस्थ त्यांच्यावर उपचार करून पाण्यात सोडून देतात. तसेच किनार्यावरील त्यांच्या अंड्यांचे सुद्धा संरक्षण करून पिल्ले बाहेर आलीत कि, त्यांना सुद्धा योग्यवेळी पाण्यात सोडून निसर्गाने दिलेल्या देणगीचे संवर्धन करतात.

RELATED ARTICLES

Most Popular