28.7 C
Ratnagiri
Tuesday, June 6, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeRatnagiriरत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थ जप्त, ह्या तरुणाला अटक

रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थ जप्त, ह्या तरुणाला अटक

साहिल मेमनला अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्याची रवानगी कोर्टाने ३ दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली आहे.

कोकण रेल्वेस्थानकानजिक असलेल्या कोकण प्लाझा समोर अंमली पदार्थासह एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली आहे. साहिल हनिफ मेमन (वय २५, रा. झारणी रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

३० मार्च रोजी झालेल्या या कारवाईविषयी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार संशयित आरोपी साहिल मेमन हा शहर पोलिसांचे गस्ती पथक रेल्वेस्थानक परिसरात संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या दुचाकीला लावलेल्या पिशवित ११ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हिरॉईन आणि ५१० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. हे अंमली पदार्थ तो विकण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून ११ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हिरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ६१ हजार ४४० रुपये इतकी आहे. तर गांजाही जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे.

साहिल मेमनला अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्याची रवानगी कोर्टाने ३ दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली आहे. अंमली पदार्थांसोबत त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular