25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeMaharashtraयापुढे घरपोच मद्य विक्री बंद, राज्य शासनाने निर्णय घेतला मागे

यापुढे घरपोच मद्य विक्री बंद, राज्य शासनाने निर्णय घेतला मागे

राज्य सरकारने लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारकडून घरपोच मद्य विक्री करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आदेश देण्यात आला आहे.कोरोना कालावधीत घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने घरपोच मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत होते. राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनली होती. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनचा परिणाम हा जवळपास सर्वच उद्योगधंद्यांवर झाला. मद्य व्यवसायालाही कोरोनाचा मोठा फटका बसला. मद्य व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी जे परवानाधारक मद्य विक्रेते आहेत, त्यांना घरपोच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, आत्ता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आले होते. राज्य सरकारने लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने देखील बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र दारूच्या दुकानांपुढे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. दारू खरेदीसाठी मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने जे दारू विक्रेते अधिकृत परवानाधारक आहेत, त्यांना घरपोच दारू विक्री करण्याची परवानगी दिली होती.

RELATED ARTICLES

Most Popular