रेल्वे डिपार्टमेंटने गणेशोत्सवासाठी काढल्या गेलेल्या कोकणातील सर्व रेल्वे गाड्यांच्या कन्फर्म तिकिटांचा बुकिंग चार्ट नावासहित जाहीर करावा, अशी मागणी मनसे पदाधिकारी गणेश कदम यांनी केली आहे. यामुळे सर्व दलाल आपोआप सापडतील, असेही त्यानी म्हटले आहे. नुकतेच मनसेचे आमदार राजूं दादा पाटील यांनी अल्पावधित आरक्षण फुल झाल्यामुळे कोकणातील चाकरमानी यांना गणेशोत्सव काळात होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त करून राज्यातील वा राज्याबाहेरील एजंट तिकिटं काढून आरक्षण फुल करत असल्याचा संशय व्यक्त केला. यासाठी कोकणी बांधवांच्या पाठीशी उभे राहून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिले.
त्याबद्दल कोकणाशी नाळ जोडलेले मनसेचे पदाधिकारी गणेश कदम यांनी समस्त कोकणवासियांच्या वतीने आमदार राजू पाटील यांचे आभार व्यक्त केले. परंतु यात रेल्वे खात्यातीलही काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप गणेश कदम त्यांनी केला आहे, जर पाचच मिनिटांत सर्व गाड्यांचे आरक्षण कन्फर्म होऊन फुल होते तर कन्फर्म झालेल्या आरक्षणचा चार्ट रेल्वे खात्याने लवकरात लवकर नावासहित जाहीर करावा तरच जनतेलाही समजेल, अशी मागणी केली आहे.