आरोग्य केंद्रावर रेन हार्वेस्टिंग प्रकल्प – १४ शाळांची निवड

105
Rain harvesting project

केंद्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध विकासकामे करताना त्याद्वारे कुशल-अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचवेळी आता शासकीय कार्यालयाच्या इमारतींसह शाळांच्या इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करणारा रिन हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्यातील १४ शाळांसह एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला एकप्रकारे मदत होणार आहे.गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या सर्व इमारतींचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सुमारे ९ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्याचा कार्यारंभ आदेशही संबंधितांना देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रेन हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी निवड झालेल्या शाळा – जवळेथर केंद्रशाळा, हसोळतर्फ सौंदळ जांभवली नं.१, कोंड्येतर्फ सौंदळ शाळा नं. १, मूर शाळा नं. ४, ताम्हाणे शाळा नं. ३, ताम्हाणे शाळा नं. २, पडवे शाळा नं. १, पडवे शाळा नं. २, कोंडसर खुर्द शाळा नं. २, प्रिंदावण बांदिवडे, ओणी शाळा नं. ३, दोनिवडे शाळा नं. १, खरवते नं. २, डोंगर.