27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiri'कोस्टल मॅरेथॉन'साठी रत्नागिरीकर सज्ज

‘कोस्टल मॅरेथॉन’साठी रत्नागिरीकर सज्ज

अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे.

पहिल्यावहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन ७ जानेवारी २०२४ ला होणार आहे. त्याकरिता रत्नागिरी हॉटेल असोसिएशनने पुढाकार घेत सहकार्य केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बाहेरगावाहून हजारो धावपटू, सहकारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. हे सर्व धावपटू हॉटेल्समध्ये राहणार आहेत. या निमित्ताने पर्यटनाचा विकासही होणार आहे. यामुळे सर्वच हॉटेल्स चालकांनी एकत्र येत या स्पर्धेचे फलक दर्शनी भागात प्रदर्शित केले आहेत. नववर्ष स्वागताला येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनाही या स्पर्धेची माहिती मिळून नोंदणी वाढत आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, बँक ऑफ इंडिया यांच्या सहकायनि ही स्पर्धा होणार आहे.

हॉटेल असोसिएशनसोबत बैठक घेण्यात आली. त्यानुसार सर्व हॉटेलमालक सर्व धावपटूंचे स्वागत जोरदार कारणार आहेत. रिफ्रेशमेंटची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली आहे. हॉटेल असोसिएशनने न्यूट्रिशन सपोर्ट देण्याचे ठरवले आहे तसेच रूम बुकिंगवर काही विशेष सवलतीही दिल्या आहे. त्यामुळे आतापर्यंत बहुतांशी हॉटेल्समधील खोल्या आरक्षित झाल्या आहेत. स्पोर्टस् टुरिझम हा अनोखा प्रकार रत्नागिरीमध्ये होतोय. त्याकरिता सगळी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. ही स्पर्धा दरवर्षी होणार असल्याने पर्यटनवाढीसाठी उपयोग होणार आहे. अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. थिबा पॅलेस येथून स्पर्धेला प्रारंभ होईल. ५, १० आणि २१ किमीची हाफ मॅरेथॉन होणार आहे.

२१ किलोमीटरसाठी थिबा पॅलेस, मारूती मंदिर, काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये अशा ९ गावांतून निसर्गरम्य वातावरणातला रस्ता निवडण्यात आला आहे. आता थंडीचाही जोर वाढला आहे. त्यामुळे ७ जानेवारीलाही चांगलीच थंडी असेल व या मार्गावरून धावताना एका बाजूला खाडीचा परिसर, डोंगर, दऱ्या, झाडी आणि सूर्योदय होताना पाहायला मिळणार आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन धावनगरी रत्नागिरी करूया, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular