27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...

उद्योगपती राज कुंद्रा यांनी केली “ही” विशेष मागणी

पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा यांनी सीबीआयला...
HomeIndiaमुख्यमंत्र्यावरील टीकेला आम. सामंतांचे सडेतोड उत्तर

मुख्यमंत्र्यावरील टीकेला आम. सामंतांचे सडेतोड उत्तर

उगाचच राजकारणासाठी राजकारण करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर दिल्लीत सन्मान वाढला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी सध्या चांगलीच चर्चेत असते. कधी मंत्रिमंडळ विस्तारामुळे, कधी आरक्षणासाठीच्या दौऱ्यांमुळे तर कधी दिल्ली दरबारी पंतप्रधानांची भेट न झाल्यामुळे. आता, निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मान-सन्मानामुळे त्यांची स्पेशल दिल्लीवारी चर्चेत असून त्यांचा शेवटच्या रांगेतील फोटो तुफानी व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत असल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही हा फोटो ट्विट करुन, हे पाहून खूपच वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून, तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य करण्यात आलेले नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!” असे ट्विट यांनी केले आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्विटवर लागलीच अशी प्रतिक्रिया दिली आहे कि, राजकारणासाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. उगाचच राजकारणासाठी राजकारण करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर दिल्लीत सन्मान वाढला आहे. राष्ट्रपती शपथग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पहिल्या रांगेत उभे होते ते कोणाला दृष्टीस पडले नाही हे दुर्देव.. असे प्रत्युत्तर आमदार उदय सामंत दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ फोटो काढण्यासाठी तिकडे उभे होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर महाराष्ट्राचा मान सन्मान निश्चितच वाढलेला आहे त्याची कमी कालावधीत अनेकवेळा प्रचिती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुठेही अवमान झाला असे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी देत सडेतोड राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular