27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunगणपतीत चिपळूणला स्वतंत्र रेल्वे सुरू करा - शौकत मुकादम

गणपतीत चिपळूणला स्वतंत्र रेल्वे सुरू करा – शौकत मुकादम

कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवाच्या काळात विनाआरक्षित मुंबई-चिपळूण विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. गणेशोत्सव काळात सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेचे आरक्षण १२० दिवस आधीच फुल्ल झाले आहे. हजारो चाकरमानी वेटिंग लिस्टवर आहेत. अनेकांना तिकीटही मिळालेले नाही. त्यांच्यासाठी विनाआरक्षित रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मुकादम यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सव काळात सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण १२० दिवसाआधी फुल्ल झाले. काही मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाले. त्यामुळे अधिकारी आणि दलाल यांच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोप मी केला होता.

रेल्वेचे आरक्षित झालेले तिकीट रद्द करून पुन्हा नव्याने आरक्षण सोडत करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. मंत्र्यांनी त्याची साधी चौकशीसुद्धा केली नाही. मी सर्वसामान्य रेल्वेप्रवाशांचे प्रश्न घेऊन चर्चेसाठी मंत्र्यांकडे वेळ मागितली त्यांनी वेळही दिली नाही. त्यामुळे एकूणच कोकणातील प्रवाशांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, हे प्रामुख्याने निदर्शनास येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप सुरू आहे. यावर्षी गणेशोत्सव होईपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होईल, याची शक्यता नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांची मदार रेल्वेवर आहे. कोकण रेल्वेमार्गावर ज्या नियमित एक्स्प्रेस धावतात त्यांना जादा डब्यांची व्यवस्था व्हावी. अनेक गाड्यांना चिपळूण-खेड या ठिकाणी थांबा नाही तो देण्यात यावा आणि गणेशोत्सव काळात चिपळूण-मुंबई विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मी रेल्वेमंत्र्यांकडे केल्याचे मुकादम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular