30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeRajapurजुवे बेट रस्त्याने जोडण्यासाठी सर्वेक्षण, होडीचा प्रवास संपणार

जुवे बेट रस्त्याने जोडण्यासाठी सर्वेक्षण, होडीचा प्रवास संपणार

जुवे बेटावर जा-ये करण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांना छोट्याशा होडीचा आधार घ्यावा लागत आहे.

गाव सीमेचे भौगोलिक संदर्भ बदलत अर्जुना नदीच्या जैतापूर खाडीच्या मध्यभागी वसलेल्या आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या तालुक्यातील जुवे बेटाला जोडणारा रस्ता उभारणीच्या सर्वेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जुवे बेटाला जोडणारा जुवे बेट खारलॅण्ड बंधारा ते देवाचेगोठणे (राघववाडी) मुख्य रस्ता हा रस्ता उभारणीच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जुवे बेटाला जोडणारा रस्ता व्हावा, अशी जुवेवासीयांची असलेली मागणी आणि त्यादृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची स्वप्नपूर्ती होण्याच्या दृष्टीने चालना मिळाली आहे.

संबंधित रस्ता सुमारे ३७० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंद असणार असून आवश्यक भूसंपादनासह रस्ता उभारणीसाठी कोट्यावधीचा खर्च येण्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि सुमारे ४४ हेक्टर क्षेत्रामध्ये वसलेल्या जुवे बेटावर जा-ये करण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांना छोट्याशा होडीचा आधार घ्यावा लागत आहे. वैद्यकीय सुविधेसह शासनाच्या अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी वा गावामध्ये रात्री अपरात्री एखादा बाका प्रसंग निर्माण झाल्यास येथील लोकांना बेटानजीकच्या जैतापूर वा अन्य ठिकाणी जा-ये करण्यासाठी होडीशिवाय पर्याय नाही.

गेल्या कित्येक वर्षापासून होडीतील हा प्रवास आजही सुरू आहे. त्याच्यातून सुटका होण्यासाठी जुवे बेटाला जोडणारा कायमस्वरूपी रस्ता व्हावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून जुवेवासीयांकडून केली जात आहे. जोडरस्ता देणार विकासाला चालना जुवे बेट गाठण्यासाठी होडीतून होणारा समुद्रप्रवास निश्चितच आनंददायी आहे. मात्र, जुवे बेटाला जोड रस्ता झाल्यास पर्यटकांच्या संख्येने वाढ होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. स्वतःची गाडी घेऊन आलेला पर्यटक गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी थांबू शकतो.

यावेळी त्याला होडीची सायंकाळची जा-ये करण्याची ‘टायमिंग’ पाळावी लागणार नाहीत. त्यामुळे पर्यटनावर आधारित छोटे-मोठ्या व्यवसायाची गावामध्ये उभारणी होऊन स्थानिकांना त्याद्वारे रोजगाराची नवनवी साधने निर्माण होऊ शकतात. निळाशार समुद्र किनारा असल्याने मस्त्य व्यवसायावर आधारित छोटे-मोठे उद्योग व्यवसायांची उभारणी गावामध्ये होऊ शकते. गावामध्ये थेट गाडी गेल्याने वाहतुकीवर होणारा अनावश्यक खर्च कमी होणार असल्याने व्यवसायवृद्धी होण्यास मदत मिळू शकते.

RELATED ARTICLES

Most Popular