28.5 C
Ratnagiri
Thursday, June 5, 2025

सागरी महामार्गावर दाभोळमध्ये पूल..

कोकणातील सागरी महामार्गावरील काळबादेवी आणि जयगड येथील...

चिपळूणमधील खाऊगल्ली अतिक्रमणमुक्त – पालिका प्रशासन

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या पालिकेने...

वाशिष्ठी किनारी संरक्षक भिंत नलावडे बंधारा सज्ज

दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी...
HomeKhedखेडमध्ये लाकडे वाहून नेणाऱ्या ट्रकने घेतला पेट

खेडमध्ये लाकडे वाहून नेणाऱ्या ट्रकने घेतला पेट

ग्रामस्थांनी तत्काळ खेड नगरपरिषदेचा बंब मागवला.

खेड-शिवतर मार्गावरील मुरडे खेडेकरवाडी नजीक जळाऊ लाकडे वाहून नेणाऱ्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवतरहून खेड दिशेने जळाऊ लाकडे वाहून घेऊन हा ट्रक (एमएच १७, क्यूजे ३७५१) निघाला होता. मुरडे खेडेकरवाडी नजीक येताच ट्रकने अचानक पेट घेतला. रस्त्यावर अचानकच ट्रक पेटल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ खेड नगरपरिषदेचा बंब मागवला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. परंतु ट्रक जळून खाक झाला. आंबये, जामगे, शिवतर, चिंचाळी, सातेरी जामगे या भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असते. या परिसरातून नेहमीच जळाऊ लाकडांची वाहतूक मुंबई- पूणे- कोल्हापूर या सारख्या मोठ्या शहरांतून होते. आज देखील अशीच वाहतूक सुरू असताना खेड- शिवतर मार्गावर ही घटना घडली.

RELATED ARTICLES

Most Popular