33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriवैद्यकीय महाविद्यालयासाठी १०६ कोटी खर्चास मंजुरी

वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०६ कोटी खर्चास मंजुरी

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता दिली असून, यासाठी १०५ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाजन म्हणाले, ‘युती शासनाच्या मागील ९ वर्षांत १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यात रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रूपात कोकणवासीयांना शासनाने दुहेरी आरोग्यदायी भेट दिली आहे. रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत.

‘स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांत केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत, तर २०१४ पासून २०२३ पर्यंत ९ वर्षांत १० वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होऊन राज्यभर आरोग्यसेवेचा विस्तार होणार आहे, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, अशा ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मितीसही मान्यतेचा शासननिर्णय काढण्यात आला आहे. त्यासाठी १०९ कोटी १९ लाख रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular