27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunचिपळूणच्या वयोवृध्दाला दाम्पत्याकडून १२ लाखांचा गंडा

चिपळूणच्या वयोवृध्दाला दाम्पत्याकडून १२ लाखांचा गंडा

या गुंतवणुकीद्वारे पवार यांना योग्य परताव्याचे आश्वासन देण्यात आले.

ठाण्यात राहणाऱ्या एका वयोवृध्द इसमाला चिपळूण शहरात राहणाऱ्या एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या महिलेने आपल्या पतीच्या मदतीने १२ लाखांना गंडा घातल्याची तक्रार पोलिसांकडून दाखल झाली. या फिर्यादी आधारे ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात सदर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शिवाईनगर भागात राहणारे पांडुरंग गोपाळ पवार (७०) हे गेल्या १२ वर्षांपासून ह्यमन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे काम करीत होते. गेल्यावर्षी ते अध्यक्षपदावरुन निवृत्त झाले. याचदरम्यान संघटनेचे राज्यभर काम करीत असताना पवार यांचा परिचय चिपळूण शहरातील एक सामाजिक कार्यकर्त्या व त्यांच्या पतीशी झाला.

त्यानंतर पवार यांनी त्या महिलेची ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा महिला प्रमुखपदी निवड केली. कामानिमित्त दाम्पत्य व पवार यांच्यात ओळख वाढली. याच ओळखीचा फायदा घेत त्या दाम्पत्याने पवार यांच्याकडे गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला. या गुंतवणुकीद्वारे पवार यांना योग्य परताव्याचे आश्वासन देण्यात आले. यावर विश्वास ठेवून पवार यांनी २९ डिसेंबर २०२१ ते १८ जानेवारी २०२३ या कालावधीत त्या दाम्पत्यास एकूण १२ लाख रुपये रोख तसेच ऑनलाईन पध्दतीने दिले. तसेंच या गुंतवणुकीबाबत कोणाकडेही बोलू नका, जर कोणाला सांगितले तर आपल्या संस्थेची बदनामी होईल, अशी धमकीही दिली. याचदरम्यान पवार यांच्या पत्नी आजारी पडल्या.

त्यांच्या औषधोपचारासाठी त्या दाम्पत्याकडे पवार यांनी पैसे मागितले असता विविध कारणे देत टाळाटाळ केली. वारंवार मागणी केलानंतर आतापर्यंत पवार यांना ७५ हजार रुपये परत केले आहे. उर्वरित राकमेबाबत विचारणा केली असता या गुंतवणुकीबाबत कुठेही बोललात तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी देत असल्याचे पवार यांनी वर्तकनगर पोलीस केलेल्या तक्रारी नमूद केले आहे. आपले अजून ११ लाख २५ हजार रुपये मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतांच पांडुरंग पवार यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्या दाम्पत्यावर भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सदाशिव विष्णू निकम अधिक तपास करीत आहेत.

तक्रार करूनही कारवाई नाही – दरम्यान, याप्रकरणी आपण चार महिन्यांपूर्वी पोलिसांकडे लेखी तक्रार केलेली आहे. त्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. आता वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले तरी अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पुढील आयुष्यासाठी तजवीज करुन ठेवली रक्कम आपण त्या पती- पत्नीला दिली आहे. जर सदर रक्कम आपणास परत मिळाली नाही, तर आपल्याला वेगळे पाऊल उचलावे लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पांडुरंग गोपाळ पवार यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular