27.1 C
Ratnagiri
Sunday, May 10, 2026

रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद! जिल्हा मध्यवर्ती बँकेची उत्तुंग भरारी; ९३.८९ कोटींचा ढोबळ नफा!

रत्नागिरी: आपल्या कोकणच्या मातीतील आणि सर्वसामान्यांच्या हक्काची...

रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी कोकणवासीय आक्रमक; खासदार अनिल देसाई यांची भेट

​कोकणच्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रत्नागिरी-दादर...
Home Ratnagiri १ हजार ३५३ योजनांपैकी ९७ पूर्ण; ११० गावे ‘हर घर जल’ घोषित

१ हजार ३५३ योजनांपैकी ९७ पूर्ण; ११० गावे ‘हर घर जल’ घोषित

Har ghar water declared

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून ‘हर घर हर जल’ युक्त गावे बनवण्यासाठी १ हजार ४९६ गावांमध्ये १ हजार ३५३ योजनाचा आराखडा तयार असून, वर्कऑर्डर देण्यात आली आहे. आतापर्यंत ९७ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ११० गावे हर घर नलसे जल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९०० कोटींचा निधी आहे. या कामांचा दर्जा पाहण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती त्यांना सांगितली. २०२२-२३ जिल्हा वार्षिक योजनेतून २७१ कोटींचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी ३१ मार्चअखेर खर्च झाला आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३०० कोटींच्या आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील १० टक्के निधी म्हणजे २३ कोटी जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. १ हजार ९९० कामांना यातून मंजुरी दिली आहे. आता किती कामांच्या निविदा, वर्कऑर्डर दिली याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक लावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ११ नद्यांचा गाळ काढणार – जिल्ह्यातील ११ नद्यांमधील गाळ आहे. जिल्हा नियोजनमधून वेगळा,काढण्याचा निर्णय घेण्यात आला जलसंपदा विभागाचा वेगळा आणि काही सामाजिक संस्थांचा मिळून सुमारे ११ कोटी ३० लाखांचा निधी मिळाला. त्यापैकी ८ कोटी चिपळूणला देण्यात आले आहेत.

सिंधुरत्नसाठी आराखडा तयार – रत्नागिरी – सिंधुदुर्गसाठी असलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा आराखडा तयार केला असून, त्याचे प्रेझेंटेशन समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांना दिले. पुढील तीन वर्षांचे काय नियोजन आहे ते दाखवण्यात आले. योजनेअंतर्गत १३५ कोटीला मंजुरी देण्यात आली आहे. ३०० कोटींचा हा आराखडा असून, दरवर्षी १०० कोटींची कामे घेतली जाणार आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभासह अन्य कामांचा यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले.