28 C
Ratnagiri
Thursday, June 5, 2025

चिपळूणमध्ये ना तुंबले नाले, ना साचले शहरात पाणी

यावर्षी मे महिन्यात झालेला पाऊस मुंबई, पुणेसारखाच...

चिपळूणवर आता राहणार ११८ सीसीटीव्हीची नजर

शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या वाढलेल्या प्रकाराना...
HomeRatnagiriरिफायनरीच्या समर्थनात वाढ

रिफायनरीच्या समर्थनात वाढ

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एका मागोमाग एक समित्या स्थापन होऊ लागल्या आहेत. आता विल्ये ग्रामपंचायतीच्या समर्थना मागोमाग विल्ये दशकोशी रिफायनरी प्रकल्प समर्थक संघटना देखील स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेमध्ये सुरुवातीला सुमारे १८५ ग्रामस्थ, शेतकरी, जमीनदार सामील झाल्याची माहिती या संघटनेचे सचिव फारूख साखरकर यांनी दिली आहे.

विल्ये ग्रामपंचायतीने रिफायनरी समर्थनार्थ ठराव करून घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहणार आहोत, असे या समितीच्या वतीने स्पष्ट जाहीर करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सुरेश तावडे,  कार्याध्यक्ष विद्याधर राणे तर सचिवपदी फारूख साखरकर यांची निवड करण्यात आली आहे.

स्थानिकांना रोजगार, वैद्यकीय, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, गावांचा सर्वांगीण विकास आणि पर्यावरणस्नेही प्रकल्पासाठी विल्ये ग्रामपंचायत जाहीर समर्थन देत असल्याचे त्यांनी ठरावामध्ये नमूद केले आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठान व कोकण जनहित संघर्ष समिती, इतर संघटनांमार्फत रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ गेली तीन-चार वर्षे पाठपुरावा सुरू असून, मौजे विलये, तारळ, गोठीवरे, सागवे, साखर, पडवे परिसरातून रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीचा मोबदला जाहीर न होता विल्ये गावच्या सुमारे २७०० एकर जमिनीची संमती पत्रेही गोळा करण्यात आली आहेत. जागा आणि समर्थनाचा विचार करून विल्ये ते सागवे परिसरामध्ये रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प ठराव करावे यासाठी विल्ये ग्रामपंचायतीने समर्थन दिले आहे.

ज्या ठिकाणी जमीन मालक जमीन द्यायला तयार आहे, त्याठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी रिफायनरी प्रकल्प मंजूर करून उभारावा, अशा आशयाचे निवेदन प्रकल्प समर्थनाच्या ठरावाच्या प्रतीसह तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडे वेल्ये ग्रामस्थांनी सुपूर्द केले.

RELATED ARTICLES

Most Popular