21 C
Ratnagiri
Sunday, March 1, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiriराड्यात फक्त ठाकरे गटालाच लक्ष्य - खासदार राऊतांचा आरोप

राड्यात फक्त ठाकरे गटालाच लक्ष्य – खासदार राऊतांचा आरोप

राणे कंपनीची दादागिरी संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

मुंबई, कोल्हापूरच्या गुंडांना चिपळुणात आणून राडा करणाऱ्या माजी खासदार नीलेश राणे यांना सत्तेचा माज आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांचा हा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही. भास्कर जाधव पक्षाचे नेते असून, त्यांच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. राड्याप्रकरणी केवळ ठाकरे गटाला पोलिस लक्ष्य करत आहेत. केवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करून कारवाईत दुजाभाव केला जात आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास दोन दिवसांत रणनीती ठरवून शिवसेना स्टाईलने रणांगणात उतरेल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी येथे दिला.

चिपळुणात झालेल्या राड्यानंतर खासदार विनायक राऊत बुधवारी जिल्ह्यात आले होते. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची रत्नागिरीत भेट घेतल्यानंतर ते रात्री उशिरा चिपळुणात दाखल झाले. या वेळी झालेल्या राड्याप्रकरणी त्यांनी रोखठोकपणे भूमिका माडंली ते म्हणाले, झालेला राडा राणे कंपनीने जाणीवपूर्वक कट घडवून आणला. त्या संदर्भात अप्पर पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. पोलिस केवळ आमच्याच लोकांवर कारवाई करत असतील तर ते अजिबात सहन करणार नाही. राणे आणि कंपनीची ही सवयच आहे. स्वतः लढायचे नाही. बाहेरील भाडोत्री गुंडांना आणून मारपीट करायची.

गुहागरच्या सभेत नीलेश राणेंनी वापरलेली असभ्य भाषा महिलांचा अवमान करणारी आहे. ही सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज आहे. चारवेळा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांना लाज वाटत नाही. चिपळूणमध्ये नीलेश राणेंचे जे गुंड आले होते त्यांची नावे मी पोलिसांना दिलेली आहेत. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही किंवा त्यांना अटक झाली नाही तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. येत्या दोन दिवसांत आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढची रणनीती ठरवली जाईल. पोलिसांनी उचित कारवाई न केल्यास आम्ही आमच्या मागनि कामाला लागू. येथील राणे कंपनीची दादागिरी संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular