HomeKhedसाफयीस्टच्या रासायनिक सांडपाण्यावर विधीमंडळात आ. निकम आवाज उठवणार

साफयीस्टच्या रासायनिक सांडपाण्यावर विधीमंडळात आ. निकम आवाज उठवणार

पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजनांचे पाणीही दूषित झाले आहे.

केमिकलयुक्त पाणी नदीत सोडण्याप्रकरणी साफयीस्ट कंपनी चांगलीन्न अडचणीत आली आहे. एमपीसीबीने कारवाईचा हातोडा उगारला असताना जनतेच्या वाढत्या तक्रारी विचार घेऊन आ. शेखर निकम यांनी हा विषय हाती घेतला असून साफ़यीस्टचा कारभार आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजणार आहे.. गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या साफ़यीस्ट कंपनीचे वेस्ट काही दिवसांपूर्वी कामथे येथील नदीत टाकण्यात आले होते. तब्बल ४ टँकर खाली करण्यात आल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजनांचे पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेदरकारपणे हे केमिकल्समिश्रित पाणी नदीत टाकण्यात आले आहे.

या संदर्भात कंपनी आणि प्रदूषण महामंडळ याच्या कार्यालयावर मनसे, शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार धडक मारली होती. त्यानंतर एमपीसीबीने कंपनी उत्पादन बंद करण्याचे आदेशही काढले होते. तर वेस्ट वाहून नेणाऱ्या ठेकेदारावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुळात राजकीय वरदहस्त असणाऱ्या ठेकेदारावर साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही, यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आ. शेखर निकम यांनी जनतेच्या तक्रारी आणि कंपनीचा कारभार यासंदर्भात आक्रमक भूमि का घेतली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनात साफ़यीस्ट कंपनीचा कारभार, ठेकेदार याने सोडलेले वेस्ट, पोलिसांची यातील भूमिका या मुद्यांवर जोरदार आवाज अधिवेशनात उठवणार आहेत.

या संदर्भात आ. शेखर निकम यांनी सांगितले की, कंपन्या आल्या पाहिजेत आणि इथे टिकल्याही पाहिजेत या मताचा मी आहे. कारण या ठिकाणी ‘रोजगार उपलब्ध होत आहे. कंपनी बंद पडून कामगार उद्धवस्त नाही झाला पाहिजे. पण जसा कामगार महत्वाचा, कंपनी महत्वाची तशी जनता सुद्धा महत्वाची असून कंपनीचा कारभार सुधारला पाहिजे. म्हणूनच हा विषय आपण हाती घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular