राजापुरातील चिंचबांध येथील अर्जुना नदीपात्रालगत असलेले सूर्यमंदिर वाचवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेला जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या धर्मसभेची जय्यत तयारी करण्यात आली असून धर्मगुरू या नात्याने जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः राजापुरात येत असल्याने मोठा उत्साह दिसून येत आहे. या धर्मसभेकडे केवळ राजापूरचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या धर्मसभेविषयी राजापूर सकल हिंदू समाजाने प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. हिंदू समाजाने ही धर्मसभा बोलावली आहे. राजापूर येथील सूर्यमंदिराचा लढा या धर्मसभेच्या माध्यमातून तीव्र करण्यात येणार आहे. या सभेला जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
लाखो कुटुंबांचा हिंदू धर्मात पुर्नप्रवेश – जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराजांच्या प्रयत्नांतून आजवर १,५२,३५४ कुटुंबांना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. त्यांनी हिंदू धर्म पुर्नप्रवेशाचे मोठे काम केले आहे. वाट चुकलेल्या व अन्य धर्म स्वीकारलेल्यांना त्यांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात आणले आहे. केवळ धर्मात आणले नाही, तर रोटी-बेटी व्यवहारही करून दिले. महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांतदेखील त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार व प्रचार केला आहे. ‘हिंदू धर्म खतरेमे है’ असे सांगत ते हिंदू धर्माबाबत सतत जागृती करीत असतात. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फलकांवरील घोषवाक्यांची सर्वत्र मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या डिजिटल
उत्साहात स्वागत होणार – ‘वक्फ के नामपर संपत्तीकी लूट है’ ‘धर्मनिरपेक्ष देशमे ये कैसी छूट है’, ‘डरेंगे तो मरेंगे’, ‘हिंदू धर्म मे ऐकता हो’, ‘सनातन सात्विक है पर कायर नाही’ अशी घोषवाक्ये मोठा चर्चेचा विषय बनली होती. असे जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज धर्मसभेला मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी राजापुरात येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
ना. नितेश राणेंची उपस्थिती – या धर्मसभेसाठी राज्यातील तरूण, तडफदार युवा नेते, राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. ते हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवीत असतात. त्यामुळे राजापूरच्या धर्मसभेत ते काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जय्यत तयारी – दरम्यान या धर्मसभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही धर्मसभा शहरातील राजापूर शिवतीर्थ (जवाहर चौक) येथे शुक्रवारी दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेला हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

