29.8 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRajapurविनापरवाना बंदुक विरोधात राजापूर पोलिसांची धडक मोहीम

विनापरवाना बंदुक विरोधात राजापूर पोलिसांची धडक मोहीम

राजापूर तालुक्यातील कोदवली तरळवाडी येथे बेकायदेशीररित्या काडतुसाने भरलेली बंदूक ठेवल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजापूर पोलिसांनी विनापरवाना बंदुक बाळगणाऱ्यां विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कोदवली आणि केळवडे अशा दोन ठिकाणी छापा टाकून चार विनापरवाना ठासणीच्या बंदुका जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील कोदवली तरळवाडी येथे बेकायदेशीररित्या काडतुसाने भरलेली बंदूक ठेवल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील कोदवली तरळवाडी येथे काडतुसाने भरलेली बंदूक विनापरवाना एकाने बाळगल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली असता, घरात काहीच आढळून आले नाही.

त्यानंतर पोलिसांनी घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोठ्याची झडती घेतली असता तेथे सिलबंद बंदूक आढळून आली. यामध्ये १० हजार रुपयांची सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक तसेच २ हजार ७०० रुपयांची ९ काडतुसांनी भरलेली सिलबंद बारा बोअरची शक्तीमान एक्सप्रेस कंपनीची बंदूक असा एकूण १२ हजार ७०० रुपयांच्या बंदुकीच्या मालसह एकाला ताब्यात घेतले आहे.

अरविंद अनु मांडवे,  संतोष अनु मांडवे, रा. कोदवली आणि नितेश सुरेश गुरव रा. केळवडे गुरववाडी अशी या तिन संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चार ठासणीच्या बंदुका, एक एअरगन व जीवंत काडतुसे असा एकूण २८ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सचिन काशिराम वीर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular