22.9 C
Ratnagiri
Friday, February 27, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeMaharashtraसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्वरओक हल्ला प्रकरणी, परबांचा सूचक इशारा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्वरओक हल्ला प्रकरणी, परबांचा सूचक इशारा

कुणाच्या तरी बोलण्याने अथवा भडकवण्यावरून जर कोणी कायदा हातात घेत असेल, तर राज्य शासन हातावर हात ठेवून बसणार नाही.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना आज आंदोनलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला. माध्यमांशी बोलताना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले,”आम्ही कर्मचाऱ्यांच्याबाबत सुरुवातीपासूनच सहानुभूतीपूर्वक भूमिका घेतलेली आहे. मागील पाच महिन्यापासून जरी संप सुरू होता असला , तरी तो संप शांततेच्या मार्गाने सुरू होता. कुणाच्या तरी बोलण्याने अथवा भडकवण्यावरून जर कोणी कायदा हातात घेत असेल, तर राज्य शासन हातावर हात ठेवून बसणार नाही. राज्य सरकारने अताताईपणे घेतलेली हि भूमिका नव्हे.

कर्मचाऱ्यांचे नेते माथी भडकवणारे भाषणं करत असताना देखील,  राज्य शासनाने कायमच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. परंतु, अशा प्रकारे कोणी जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र राज्यशासन हातावर हात धरून बसणार नाही. पुढे बोलताना अनिल परब म्हणाले,  न्यायालयाने आपला निर्णय तर दिला आहे. कायदा हातात घेतल्यानंतर कोणाचीही सुटका नाही. न्यायालयाने जो काही एसटी संपाबाबत निर्णय दिला आहे त्याचा सर्व कामगारांनी आदर ठेवायला पाहिजे होता.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी दुपारी साडे तीन वाजता महत्वाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला संबंधित वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित राहणार असून अनिल परब यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. मागील पाच महिने एसटी कामगारांचा बेमुदत संप सुरु आहे. विलीनीकरणाची सोडून इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परवाच्या दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वरओक निवासस्थानावर जमावाने जाऊन हल्ला केला, दगड चपला भिरकावल्या. हे कृत्य निंदनीयच आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेता येणार नाही,  अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानंतर या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular