25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeKhedगुहागर विधानसभा भाजपच लढवणार - केदार साठे

गुहागर विधानसभा भाजपच लढवणार – केदार साठे

उमेदवार कोण याचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत होईल.

गुहागर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार असल्यामुळे इथे महायुती म्हणून कोणीही दावा करू शकतो. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा असल्याने ही जागा भाजपच लढवेल, असा निर्णय झाला आहे. भाजपकडून उमेदवार कोण याचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत होईल, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी सांगितले. तसेच उबाठाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पराकोटीची टीका केल्याबद्दल त्यांनी ठाकरे यांचा निषेध व्यक्त केला.

गुहागरमध्ये आयोजित भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. भाजपचे उद्या (ता. ३) उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन भाजपच्या केवळ ३८० निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नीतेश राणे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे गुहागरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना साठे म्हणाले, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना राबवली जाते.

महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना आणखी ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  बेरोजगार युवकांसाठी लाडका भाऊ योजना राबवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण होत आहे. सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याप्रमाणे राज्यात ७८ ठिकाणी अधिवेशने घेण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर अधिवेशने होतील. याप्रसंगी साठे यांनी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला. ते म्हणाले, राजकीय मतभेद असतात.

राजकारणाची दिशा सतत बदलते; मात्र मी तरी राहीन किंवा तू तरी राहशील, अशी भाषा कोणीच वापरत नाहीत. महाराष्ट्राची प्रगती करणाऱ्या देवेंद्रजींच्या सरकारमध्ये शिवसेनेचेही अनेक मंत्री त्यावेळी होते. त्या कामांच्या बळावर युती म्हणून शिवसेनेचे आमदार विजयी झाले; मात्र राजकीय मतभेद झाल्यावर संपवण्याची भाषा बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

RELATED ARTICLES

Most Popular