31.5 C
Ratnagiri
Sunday, January 19, 2025

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय ग्राहकहिताविरोधी – मोहन शर्मा

राज्यात स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा घेतलेला निर्णय हा...

ठाकरे गटातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक…

रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे....

मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही....
HomeChiplunअखेर “त्या” ठग दाम्पत्याला, पुण्याहून घेतले ताब्यात

अखेर “त्या” ठग दाम्पत्याला, पुण्याहून घेतले ताब्यात

ठेवींबद्दल काहीच पुरेशी माहिती मिळत नसल्याने, ग्राहक देखील साशंक झाले त्यामुळे अखेर त्या ग्राहकांनीच पुढे येऊन पोलीस तक्रार दिली.

चिपळूण मधील खेर्डी येथील धनरेषा अर्बन निधी लि. कंपनीमध्ये तब्बल ९६ लाखांचा घोटाळा करून पोबारा केलेल्या पती पत्नीस चिपळूण पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

धनरेषा अर्बन निधी लि. कंपनीमध्ये राहुल अरविंद भगत वय ३६, प्रियंका राहुल भगत वय ३३ हे पती-पत्नी कार्यरत होते. २०२० पासून खेर्डी येथे धनरेषा अर्बन निधी लि. कंपनी कार्यरत होती. या काळात कंपनीत येणार्‍या ग्राहक वर्गाला आकर्षक दामदुप्पट ठेवींसह तसेच संचालकपदी वर्णी लावतो अशी आमिष राहुल भगत व प्रियंका भगत यांनी दाखवली होती.

ग्राहक आकर्षित होताच संधीचा फायदा घेत त्यांनी तब्बल ९६ लाखांचा घोळ करत ग्राहकांची फसवणूक केली. ठेवींबद्दल काहीच पुरेशी माहिती मिळत नसल्याने, ग्राहक देखील साशंक झाले त्यामुळे अखेर त्या ग्राहकांनीच पुढे येऊन पोलीस तक्रार दिली. या प्रकरणी फसलेल्या २४ ग्राहकांनी पुढे येवून हा घोटाळा पुढे आणत चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनंतर या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान ग्राहकांनी उचललेले पाऊल लक्षात येताच, आपल्याला अटक होऊ शकते याबाबत कुणकुण लागताच, त्या पती-पत्नीनी चिपळुणातून पोबारा केला. त्या दोघांचा पोलीस शोध घेत असतानाच ते पुणे-हवेली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी जाऊन सोमवारी अटक करण्यात आली. पुढील तपास कारवाई सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular