28.1 C
Ratnagiri
Friday, June 2, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeChiplunपरशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने

परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने

तरीही परशुराम घाटातील एक मार्गिकादेखील सुरू करणे अद्याप पर्यंत शक्य झालेले नाही.

खेड तालुक्यातील भोस्ते आणि चिपळूण तालुक्यातील कामथे या दोन्ही अवघड घाटांच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कशेडी, भोस्ते आणि कामथे या तिन्ही घाटातील अपघातांचा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम वेळेत सुरू न झाल्याने या घाटाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून अपघातांचा धोका कायम सतावत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत चार अवघड घाट येतात. यामध्ये कशेडी, भोस्ते, परशुराम आणि कामथे या घाटांचा समावेश केलेला आहे. महामार्गावरील या अवघड घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान, रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग बांधला जात असून त्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कशेडी घाटाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत परशुराम घाटाचा दरीकडचा काही भाग ढासळला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान महामार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी चिरणी-आंबडसमार्गे चिपळूण या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात येत होता. पावसाळा संपल्यावर ठेकेदाराने पुन्हा जोरदार कामाला सुरवात केली. यासाठी काही महिने परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा चिरणी-आंबडसमार्गे वळवण्यात आली.

सुमारे दोन महिने परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवून युद्धपातळीवर चौपदरीकरणाचे काम सुरू ठेवण्यात आले होते; मात्र तरीही परशुराम घाटातील एक मार्गिकादेखील सुरू करणे अद्याप पर्यंत शक्य झालेले नाही. आतापर्यंत जे काम झाले आहे ते पाहता ठेकेदाराने कितीही ताकद लावली तरीही मे २०२३ अखेर घाटाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular