26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeKhedपहिल्याच पावसात महामार्गावर दरड कोसळली

पहिल्याच पावसात महामार्गावर दरड कोसळली

प्रशासनाने युद्ध पातळीवर दरड दूर करत वाहतूक सुरळीत केली.

शनिवारी संध्याकाळपासून महाड-पोलादपूर तालुक्यात धुवाँधार पाऊस पडत असल्याने मुंबई- गोवा राष्ट्रीय महाम ार्गावर पहिल्याच पावसाळ्यामध्ये दरड कोसळली. यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. प्रशासनाने युद्ध पातळीवर दरड दूर करत वाहतूक सुरळीत केली. याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई-गोवा महाम ार्गावर महाड तालुक्यातील नडगाव या गावच्या ठिकाणी धुवाँधार पाऊस पडत असल्याने पहिल्याच पावसाळ्यामध्ये दरड कोसळून भर रस्त्यामध्ये दगड माती आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

शनिवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ही दरड कोसळली. याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जेसीपीच्या माध्यमातून दरड माती दगड हटविली. काही काळानंतर मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली. वाहतूक ठप्प झाल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular