27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRajapurबसस्थानकाच्या नव्या इमारतीचा चार महिन्यांत पहिला स्लॅब, कामाने घेतला वेग

बसस्थानकाच्या नव्या इमारतीचा चार महिन्यांत पहिला स्लॅब, कामाने घेतला वेग

१० कोटींवरून आता हे काम १८ कोटींवर गेले आहे.

गेली सहा वर्षे रखडलेल्या मुख्य हायटेक बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा चार महिन्यांतच पहिला स्लॅब टाकून झाला. त्यामुळे ठेकेदार कंपनी असलेल्या निर्माण ग्रुपने वेगाने या बसस्थानकाच्या कामाला सुरुवात केल्याने फरफट होत असलेल्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्य हायटेक बसस्थानकाचा जूना ठेका रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया करून रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका देण्यात आला. मुळातच सहा ते सात वर्षे हे काम रखडल्याने या कामाला टाईमबॉण्ड देण्यात आला आहे. त्यानुसार टार्गेट घेऊन ठेकेदार कंपनी हे काम करत आहे.

१० कोटींवरून आता हे काम १८ कोटींवर गेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला निधी दिला जाणार आहे. काम रखडल्याने प्रवाशांची फरफट होत आहे. ऊन, पावसात प्रवासी रस्त्यावर असतात. त्या ठिकाणी गाड्या लागल्या की वाहतूक कोंडी होते. अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काम होण्यासाठी आंदोलन केले. नागरिकांचा रोष वाढत गेल्यामुळे शासनाने यावर पर्याय काढून ठेकेदार बदलून कामाला सुरुवात केली.

RELATED ARTICLES

Most Popular