27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मुसळधार पावसाने भातपीक पाण्याखाली, साखरपा पंचक्रोशीला झोडपले

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीला मुसळधार पावसाने बुधवारपासून...

लांज्यात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास पोलिस बंदोबस्तात प्रारंभ

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात रस्त्याच्या कडेला...

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...
HomeEntertainmentहंसिकाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच झाली ट्रोल

हंसिकाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच झाली ट्रोल

सोहेल कथुरियासोबत लग्न करून हंसिकाने तिच्या जिवलग मैत्रिणीचा विश्वासघात केल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्न आटोपल्यानंतर हंसिकाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोहेल कथुरियासोबत लग्न करून हंसिकाने तिच्या जिवलग मैत्रिणीचा विश्वासघात केल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.

वास्तविक सोहेल कथुरियाची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची चांगली मैत्रीण आहे. हंसिकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी सोहेलने रिंकेला घटस्फोट दिला होता. सोहेल आणि रिंकीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते.

हंसिका मोटवानीने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताच तिच्या कमेंट सेक्शनमध्ये ट्रोलर्सचा पाऊस पडला. ट्रोल करणाऱ्यांपैकी एकाने हंसिकाच्या फोटोवर लिहिले- ‘कर्म सर्वकाही पाहत आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’ तर एकाने लिहिले- ‘तुझ्या जिवलग मैत्रिणीच्या पतीशी लग्न केल्याबद्दल तुझे अनेक अभिनंदन, आशा आहे की तुझी जिवलग मैत्रीणही तुझ्याशी तशीच वागेल, जसे तू तुझ्या जिवलग मैत्रिणीशी केलेस.’

खरं तर, हंसिका मोटवानीने ज्याच्याशी लग्न केले आहे तो सोहेल कथुरिया तिची बेस्ट फ्रेंड रिंकी बजाजचा माजी पती आहे. हंसिकाच्या लग्नाच्या काही दिवस आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये हंसिका सोहेल आणि रिंकेच्या लग्नात हजेरी लावताना दिसत आहे, त्याशिवाय ती सोहेल आणि रिंकेच्या लग्नातही जबरदस्त डान्स करताना दिसली होती. एका ट्रोलरने लिहिले- ‘सोहेलसोबत लग्न करून तू तुझ्या मैत्रिणी रिंकीला फसवले आहेस.’ हंसिकाच्या फोटोवर एकाने लिहिले- ‘कधीही कोणाचेही आयुष्य खराब करू नका, खासकरून जेव्हा ती तुमच्या जवळ असते.’

RELATED ARTICLES

Most Popular