26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeChiplunचिपळुणात किरण सामंतांच्याहस्ते महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

चिपळुणात किरण सामंतांच्याहस्ते महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

२४ एप्रिल रोजी रत्नागिरीत होणारी सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांची विजयी सभा झाली पाहिजे,

महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपआपसांतील हेवेदावे व मानापमान बाजूला ठेवा. एकदिलाने काम करूया. कोणीही मनात संभ्रम ठेवू नये. तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत होणारी सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांची विजयी सभा झाली पाहिजे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूण येथील पुष्कर सभागृहात आयोजित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी केले. यावेळी शिवसेनेचे किरण सामंत यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार ना.नारायणराव राणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, सिंधुरत्न माजी आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, आरपीयायचे नेते दादा मर्चेंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंत खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नेते दादा साळवी, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना चिपळूण तालुकाध्यक्ष संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडळ अधिकारी ‘श्रीराम शिंदे, शिवसेना तालुकाधिकारी निहार कोवळे, माजी सभापती सौ. पूजा निकम, शशिकांत चाळके, मनसे चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ना. सामंत म्हणाले की, महायुतीकडून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत इच्छुक होते. मात्र, ना. नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही राणेंचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी ना. नारायणराव राणेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी किरण सामंत उपस्थित राहिले नसते. तर संभ्रम निर्माण झाला असता. परंतु ते आवर्जून उपस्थित राहिले होते. यामुळे कोणीही मनात संभ्रम ठेवू नये, असा सल्ला ना. सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तर ते पुढे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शुक्रवारी जे वातावरण होते. तसं टिकवून ठेवून राणेंना अडीच लाख मताधिक्याने विजयी करूया. भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांची २४ एप्रिल रोजी रत्नागिरी जी सभा आहे ती महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांची विजयी सभा झाली पाहिजे. सभेची गर्दी पाहून शहाना देखील आपला उमेदवार विजयी होईल, असे वाटले पाहिजे. या दृष्टीने महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला गर्दी होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन केले.’

तर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मेहनत घेऊन प्रत्येक बुथवर होणाऱ्या मतदानामध्ये महायुतीचे उमेदवार ना.नारायणराव राणे यांना ७० टक्केपेक्षा जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने काम करावे, यादृष्टीने एकत्रितपणे नियोजन करून प्रचार करावा, असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले.

आ. शेखर निकम यांनी कोणतेही अफवांना बळी पडू नका महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करूया व चिपळूण- संगमेश्वरमधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया, असे उपस्थित पदाधिकारी व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. या बैठकीचें सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. या बैठकीला महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होतो.

RELATED ARTICLES

Most Popular