29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriथर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सतर्क

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सतर्क

पोलिसदलाने जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. वाहतूककोंडी होऊ यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नियुक्ती केली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायजर चाचणी घेतली जाणार आहे. बीचवरील दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षारक्षकांपासून ग्रामपंचायत, पालिकांना योग्य सूचना दिल्या आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. नववर्षाच्या स्वागताच्यादृष्टीने पर्यटक कोकणाला जास्त पसंती देतात. येथील निळाशार समुद्र अथांग पसरलेले स्वच्छ आणि सुंदर किनारे हेच पर्यटकांचे आकर्षण आहे.

त्यासाठी मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील अनेक पर्यटक पाण्यात डुबण्याचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्गाची मुक्त हस्ते कोकणावर केलेली नैसर्गिक उधळण पाहण्यासाठी येतात. नातळची सुटी नुकतीच संपली. या काळातही गणपतीपुळे, दापोली, गुहागर, पावस, राजापूर, रत्नागिरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेटी दिल्या. किनाऱ्यांवरही मोठी गर्दी होती. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत. या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसदलाचा प्रयत्न आहे. यासाठी पोलिसदलाने जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

याबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘पर्यटकांनी आनंद लुटावा, कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या काळात जास्तीत जास्त वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. म्हणून ज्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे अशा ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे.

अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी काही टोळक्यांद्वारे महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. काही गुन्हे घडतात यासाठी साध्या वेशात महिला व पुरुष पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहेत. अतिउत्साहामुळे आणि पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे अनेक तरुण वेगवेळ्या बीचवर समुद्रात उत्तरतात. त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि एखादी दुर्घटना घडते. हे टाळण्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षागार्ड नेमले आहेत. तेथील ग्रामपंचायत, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular