27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKokanसुट्ट्यांसाठी पर्यटकांची कोकणातील किनारी भागाला प्रथम पसंती

सुट्ट्यांसाठी पर्यटकांची कोकणातील किनारी भागाला प्रथम पसंती

किनाऱ्यावरील फेरीवाले, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा व्यवसाय चांगला सुरू झाला आहे.

नवीन वर्ष २०२३ काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. २०२२ च्या सुरवातीलाच कोरोनाचे निर्बंध उठले आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द गणपतीपुळे मंदिर व किनारा, मत्स्यालय, पावस याठिकाणी पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. दिवाळी, ख्रिसमस या हंगामात पर्यटन स्थळे फुलून गेलेली असतात. त्यात शालेय सहली देखील दोन वर्षांनी सुरु झाल्याने, त्याची भर पडत आहे.

किनाऱ्यावर प्रचंड गर्दी वाढल्यामुळे पर्यटनस्थळांवरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीत वाढ झाली आहे. यंदाही पर्यटन स्थळी मोठी गर्दी होऊ लागली आहे. सद्या कोंकणात थंडीही वाढली असून पर्यटनाला पोषक वातावरण आहे. कोरोनातील निर्बंधांनंतर सलग दोन वर्षे हंगामात पर्यटन व्यवसाय उत्तरोत्तर बहरत चालला आहे.

गणपतीपुळेप्रमाणे हर्णै, दापोली परिसरातील किनारी भागातलाही पर्यटकांनी पसंती दिली आहे.  ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळेमध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सलग सुट्ट्यामुळे त्यात वाढ होणार आहे. हर्णै, दापोलीतही पर्यटकांचा राबता वाढल्याने स्थानिक व्यावसायिक समाधानी आहेत.

शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांना चांगलीच संधी मिळाली आहे. अनेकांनी पंधरा दिवस आधी पासूनच हॉटेल, निवास आरक्षित करून ठेवले होते. दिवसभरात अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचा गणपतीपुळे देवस्थानकडून देखील दुजोरा मिळाला आहे. अनेक पर्यटक निवासासाठी आल्याने लॉजिंगवाल्यांना देखील सुगीचे दिवस आले आहेत.

किनाऱ्यावरील फेरीवाले, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा व्यवसाय चांगला सुरू झाला आहे. ही गर्दी १ जानेवारीपर्यंत राहील असा अंदाज आहे. परंतु, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाने खासगी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची मात्र गैरसोय होतं असल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular