25.8 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRajapurवेत्ये किनारपट्टीवर सीगल पक्ष्यासह अन्य परदेशी पक्षी अवतरले

वेत्ये किनारपट्टीवर सीगल पक्ष्यासह अन्य परदेशी पक्षी अवतरले

थंडीच्या कालावधी सुरु झाला कि, या दरम्यान दरवर्षी हे पक्षी स्थलांतर करून, कोकण किनारपट्टीवर वास्तव्याला येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पश्‍चिम किनारपट्टीवर बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या सीगल पक्ष्यासह अन्य परदेशी पक्षी अवतरले आहेत. बगळ्यासारखेच दिसणारे पण त्यांचे विशेष रूप म्हणजे लाल चोच, पांढरेशुभ्र पिसांनी वेढलेले भरीव शरीर अशा आकर्षक दिसणाऱ्या या पक्ष्याच्या थव्याने पश्‍चिम किनारपट्टीवरील समुद्रकिनारा फुलून गेला आहे. या पक्ष्यांच्या किलबिलाट आणि गोंगाटाने परिसर गजबजून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

थंडीच्या कालावधी सुरु झाला कि, या दरम्यान दरवर्षी हे पक्षी स्थलांतर करून, कोकण किनारपट्टीवर वास्तव्याला येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टीवरील सीगल पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यामध्ये देखील अधिकची भर पडली आहे.

थंडीच्या कालावधीमध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या बर्फामुळे या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. अशावेळी ज्या परिसरात खाद्य मिळणे शक्य आहे किंवा वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरामध्ये हा पक्षी काही कालावधीपुरता अन्य पक्ष्यांप्रमाणे स्थलांतरित होत असतो. त्याप्रमाणे सीगल पक्षी यावर्षीही तालुक्यात स्थलांतरित झाला आहे.

राजापूर तालुक्यातील वेत्ये आणि परिसरामध्ये सीगलचे वास्तव्य निदर्शन आले आहे. थंडीच्या कालावधीमध्ये मुबलक खाद्य आणि समागम करण्यासाठी अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरित होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी परतात. स्थलांतरित होणारे पक्षी सुमारे १५ हजार किमीचे अंतर साधारणतः तीन महिन्यात ताशी २० ते २५ किमीच्या वेगाने कापतात.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरित पक्षी समुद्रकिनारपट्टीवर आले आहेत. आठ दिवसांपूर्वी त्यांचे आगमन झाले असून सद्यःस्थितीमध्ये त्यांची संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular