28.2 C
Ratnagiri
Sunday, May 19, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriसार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का?

सार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का?

बंधाऱ्याचे काम आठ दिवसात सुरू होईल, असे लेखी आश्वासन पत्तनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.

तालुक्यातील मिऱ्या गावच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या पावणेदोनशे कोटीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला वर्ष झाले तरी एकही दगड लागलेला नाही. शासकीय यंत्रणा नेमकी करते काय?  मग ती नक्की आहे तरी कोणाची? सार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का? आणि अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करायचा. जनता मेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, अशी खरमरीत प्रतिक्रिया उपोषणकर्ते शांताराम उर्फ आप्पा वांदरकर यांनी दिली आहे. बंधाऱ्याचे काम आठ दिवसात सुरू होईल, असे लेखी आश्वासन पत्तनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.

धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू व्हावे, प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेला जाग येण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आप्पा वांदरकरांसह मिऱ्यावासीयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. ते म्हणाले, मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला सुमारे १६० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शासनाने दिला असून देखील, मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर हा बंधारा बांधणार येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कामाचा आरंभ तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मिऱ्या गावामध्ये पावसामध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असल्याने, त्यांच्या संरक्षणासाठी हा बंधारा बांधण्यात येणार आहे. यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेऊन हे काम जलदगतीने आणि दर्जेदार व्हावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. परंतु, या गोष्टीला वर्ष झाले तरी या बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात देखील झालेली नाही.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला पत्तन विभागाने दुसर्यांदा दणका दिला आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याचे वर्षभरात अपेक्षित काम न झाल्याने १८ लाख ८० हजाराचा दंड करण्यात आला आहे. नुकताच हा प्रस्ताव पत्तन विभागाच्या मुख्य कार्यालयाने मंजूर केल्याचे पत्तन विभागाने सांगितले. त्यानंतर ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत काम सुरू न केल्याने दुसऱ्यांदा १८ लाखाचा दंड केला आहे. पत्तन विभागाने आतापर्यंत ३७ लाखाचा दंड ठेकेदाराला केला आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular