29.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeChiplunपरशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण आणि खेडकडील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

दिवसांपासून दोन गेल्या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान मातीचा ढिगारा कोसळून रस्त्यावर आल्याने या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस दहीहंडी पासून सक्रिय झाला आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परशुराम घाटातील कटिंग करण्यात आलेल्या डोंगरातून पाणी येत असल्याने मातीचा भाग ठिसूळ बनून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला.

यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण आणि खेडकडील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळावर पोलिस आणि महामार्गचे अधिकारी दाखल झाल्यानंतर सिंगल लेनवरून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने परशुराम घाटातील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular