27.1 C
Ratnagiri
Thursday, November 14, 2024

मुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबईत मंगळवारी रात्री...

परशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट...
HomeIndiaताडोबा टायगर सफारीमध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय

ताडोबा टायगर सफारीमध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय

ताडोबा हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असणाऱ्या सफरीमध्ये अनेक प्रकरचे वाघ पाहायला मिळतात. याआधी ताडोबातील टायगर सफारी दरम्यान अनेकानी उघड्या जिप्सीतून वाघ पाहण्याचा आनंद अनेकदा घेतला असेल मात्र, मोठ्या विचारांती आता या खुल्या जिप्सीच्या डिजाईनमध्ये मोठा आणि अमूलाग्र बदल करण्याचा महत्वाचा निर्णय ताडोबा प्रशासनाने घेतला आहे.

या बदलाबाबत माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनेक पर्यटक ताडोबा टायगर सफारी साठी आवर्जून येतात. त्यामुळे प्रथम पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ताडोबा प्रशासनानं सर्व पर्यटक उघड्या जिप्सींना जाळी लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी ताडोबा प्रशासनाकडून बंदिस्त जिप्सीचे डिजाईन्स देखील मागविण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र जनगणनेचं काम करताना महिला वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा वाघाच्या अनपेक्षित हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू ओढवला. यामुळे हिंस्र श्वापदांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. पुन्हा एकदा जंगली श्वापदांचा हल्ला हा किती अनपेक्षित असू शकतो हे स्पष्ट समोर आले आहे. विशेष म्हणजे याआधी देखील ताडोबा आणि उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात वाघाने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरी देखील अनेकदा पर्यटक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून जवळून वाघ पाहण्याचं, त्यांचा रस्ता अडवण्याचं धाडसी पराक्रम करायला पाठी पुढे पाहत नाहीत. त्यामुळे जर पर्यटक जर ऐकत नसतील तर, जिप्सीच्या डिजाईनमध्येच असे बदल करावे ज्यामुळे वाघ किंवा इतर जंगली प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकणार नाही, अशी मागणी पुढे आलेली.

RELATED ARTICLES

Most Popular