मिऱ्या बंधाऱ्यावर ‘मरीन ड्राईव्ह’ सारख्या सुशोभिकर – ४१ कोटींचा प्रस्ताव

202
Beauties like 'Marine Drive' on Mirya Bhandara

हुचर्चित मिऱ्या बंधारा पूर्णत्वास गेल्यानंतर या ठिकाणी मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठीच ४१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पर्यटनाला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. मुरुगवाडापासून पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) पर्यंतचा साडेतीन किलोमीटर लांबीचा व तीन मीटर रुंदीचा धुपप्रतिबंधक बंधारा या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी ५ मीटर उंचीची आणि १३०० मीटर पर्यंत टेट्रॉपॉट टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रोजगार निर्मिती आणि पर्यटन विकास करण्यासाठी या ठिकाणी सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव शासनाने पतन विभागाकडे पाठविला आहे. सुशोभिकरणात या ठिकाणी गणेश विसर्जनाकरिता फुटपाथपासून समुद्र किनाऱ्यापर्यंत रॅम्प व पायऱ्यांचे वेगवेगळ्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पार्किंगची व्यवस्था, वीजेच्या बचतीसाठी सोलर व्यवस्था या ठिकाणी असेल. तसेच १२ मीटर उंचीचे १२ निरीक्षण टॉवर्सही उभारण्यात येणार आहेत. त्यावर हायमास्ट दिव्यांची असेल. ‘सार्वजनिकक शौचालय, पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई या ठिकाणी अत्यंत कल्पकतेने करण्यात येणार आहे. या व्यवस्थेवर सीसीटीव्हीचा वॉच राहिल.