27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...
HomeSindhudurgओसरगाव टोल नाक्याजवळ, खाजगी बस जळून खाक

ओसरगाव टोल नाक्याजवळ, खाजगी बस जळून खाक

या लक्झरी मधून एकूण ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बस क्रमांक एम.एच.१२ के.क्यू.५७६९ ला आग लागून त्यामध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून एकूण ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशीः पुणे ते सावंतवाडी अशी खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस आज सकाळी सहाच्या सुमारास ओसरगाव येथे आली असता बसच्या पाठीमागे अचानक आग लागली. या बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. बसच्या पाठीमागून धूर येत असल्याचे चालक मंगेश वसंत वडर वय २८, रा. आकेरी-पालववाडी यांच्या लक्षात येताच त्यांनी पुढील धोका ओळखून झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले.

काही प्रवाशांनी बसच्या मागील डिकीतून सामान बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला; मात्र बसने पाठीमागूनच पेट घेतल्याने ते शक्य झाले नाही. ही खासगी बस सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना हा प्रकार घडला. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

त्यानंतर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने पुढील ठिकाणी सोडण्याची सोय करण्यात आली. असे बस जळण्याचे प्रकार महामार्गावर अधूनमधून घडत असल्याने आणि खासगी प्रवासी वाहतूक अवैधरित्या सुरू असून त्यावर प्रादेशिक परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. प्रवासी घेऊन जाणाऱ्या या गाड्या सुस्थितीत नसतात, असे बऱ्याचदा लक्षात आले आहे. प्रवाशांकडून वारेमाप भाडे आकारले जाते; मात्र याबाबत आरटीओ कार्यालयाकडून काहीच कारवाई होत नसल्याने प्रवाशांत नाराजगी पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular