लांजात ‘आपला दवाखाना’चे गुपचूप उद्घाटन

298
Your clinic in Lanjat

लांजा शहरातील स्वामी स्वरूपानंद नगर येथील भरवस्तीतील आरोग्यवर्धिनी आपला दवाखाना स्थानिक नागरिक यांच्या रोषामुळे आणि आमदार, नगरपंचायत प्रशासन यांना डावलून घाईघाईत गुपचूप उद्घाटन कार्यक्रम ‘अखेर आरोग्य विभागाला रद्द करावा लागण्याची नामुष्की आज आली. या दवाखाना उद्घाटन कार्यक्रमावरून आम दार डॉ. राजन साळवी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशास दिला आहे. भरवस्तीतील दवाखाना ‘जागेवरून स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन सुरक्षित ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे. स्थानिक नगरसेवक मंगेश लांजेकर यांच्यावतीने बाबा लांजेकर यांनी स्वामी ‘स्वरूपानंद नगर रहिवासीच्यावतीने योग्य भूमिका मांडली. आज १ मे रोजी नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्राच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्रांचे टप्प्याटप्प्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे सोमवारी विविध तालुक्यात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील १२ आरोग्यवर्धिनी केंद्र नागरी भागात मंजूर झाली आहेत. तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तर राज्यात ३४२ ‘आपला दवाखाना’ सुरु होणार आहे.

नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्रांचे टप्प्याटप्प्याने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानात रुपांतर केले जाणार आहे. लांजा शहरातील स्वामी स्वरूपानंद नगरात सावंत चाळ या ठिकाणी सोमवारी सकाळी १० वाजता लांजा तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका अधिकारी हे काही निवडक आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत भाड्याने दिलेल्या इमारतीत फीत लावून उद्घाटन करण्याच्या तयारीत होते. उद्घाटन होण्यापूर्वी काही अर्धा तास अगोदर या भागातील नगरसेवक मंगेश लांजेकर यांना कार्यक्रम आहे, असा फोन करण्यात आला. नगरसेवक लांजेकर हे कामानिमि त्त मुबंई येथे गेल्याने त्यांनी भाऊ बाबा लांजेकर यांना सांगितले. हा दवाखाना वस्तीत असल्याने शेजारील रहिवासी जाधव यांची विहीर आहे. पाणी दूषित होणार असल्याने या दवाखान्याचा आरोग्य दाखला विहित अटीत बसतो का? यावर कोणतेही शंका निरसन नाही. रहिवासी यांची तक्रार निवारण न करता घाईघाईत उद्घाटन करण्याच्या कृतीवर बाबा लांजेकर आणि स्थानिक रहिवासी यांनी आरोग्य अधिकारी यांना जाब विचारला. तहसीलदार कदम यांनी सामंजस्याने वाद मिटवून आरोग्य सेवा मिळण्यासाठी योग्य भूमिका घेण्याचे आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.

नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीचे अधिकारी यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. घाईघाईने हा दवाखाना सुरू करण्याचे प्रयोजन काय? असा सवाल विचारण्यात आला. नगरपंचायतीने या उद्घाटन कार्यक्रमाबाबत काहीच माहीत नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्थानिक रहिवासी यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांना हा दवाखाना उद्घाटन कार्यक्रमाबाबत कैफियत सांगितल्यावर आमदार साळवी यांनी आरोग्य अधिकारी मारुती कोरे यांना चांगलेच धारेवर धरले. आज १ मे, आमदार या नात्यानं राजशिष्टाचाराप्रमाणे नियोजित कार्यक्रम सोमवारी लांजात होते. राज्य शासनाचा आरोग्य सेवा कार्यक्रम आयोजित असताना मला का या उद्घाटनाला डावलले? असा सवाल करून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला. वरून आदेश आल्याचे डॉ. कोरे यांनी सांगून सर्वोतोपरी तोडगा काढून दवाखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. ‘आपला दवाखाना’ अंतर्गत नगरपालिकांच्या किंवा भाड्याच्या इमारतीत हे दवाखाने होतील. त्यात ‘ओपीडी’ स्वरूपात सेवा देण्यात .येणार आहे. ‘आपला दवाखाना’मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, प्रयोगशाळा चाचण्या, गर्भवती मातांची तपासप्पी, लसीकरण सेवा, तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीदेखील करण्यात येणार आहेत.