30.1 C
Ratnagiri
Sunday, May 19, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeLifestyleबहुगुणकारी दही

बहुगुणकारी दही

प्रत्येक जण एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असत. कोणी वैयक्तिक तर कोणी इतर कोणत्या कारणांनी त्रस्त आहे. पण या सर्व टेन्शन चा परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणात होतो. मनाचे अस्वास्थ शरीरावर विपरीत परिणाम करत असते.

सध्या अनेकांना डिप्रेशनचा त्रास असतो. त्यासाठी डाएटकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी रोज एका वाटी दह्याचे सेवन करावे. त्यामध्ये मिठ किंवा सारख तुम्ही टाकू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दही खाऊ शकता. रोज दही खाणे चांगले परंतु, दुपारच्या वेळी दही खाणे शक्यतो टाळावे.

दह्यामध्ये असणारा लॅक्टोबैसिलस हा बॅक्टेरिया फ्रेंडली जीवाणू असून, दही खाल्याने टेंशन किंवा डिप्रेशन कमी होते. जाणून घेऊया दही खाण्याचे फायदे थोडक्यात.

कोणत्याही गोष्टीची वेळ आणि प्रमाण खूप महत्वाचे असते. दह्यामध्ये पुरेश्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन बी-१२, विटामिन बी-२, मेग्नेशियम आणि पोटेशियम ही पोषक घटकतत्वे असतात. जर तुम्ही दही साखरेसोबत खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरेल. दह्यामध्ये अनेक  विटामिन्स असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन देखील वाढते. दह्यामध्ये  प्रोबायोटिन्स असतात.  त्यामुळे तणाव येत नाही. त्यामुळे रोज सकाळी दही खावे.

दह्याचे सेवन करणे जसं शरीरासाठी चांगलं असत तसं ते खाताना विशिष्ट काळजी घेणं देखील गरजेच आहे. दह्यासोबत काही पदार्थ वर्ज्य करणे गरजेचे आहेत. नाहीतर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे दह्यासोबत ठराविक पदार्थ खाण्याचं टाळणेच गरजेचे आहेत.

त्यामध्ये दह्यासोबत आंबट फळाचे सेवन करू नये,  कारण दही आणि फळांमध्ये वेगवेगळे घटकद्रव्य असल्याने त्याचे एकत्रितपणे पचन होत नाही. त्यामुळे दही आणि आंबट फळे एकत्र खाणे टाळावे. तसेच दह्यासोबत माशांचे सेवन करून नये, हे दोन्ही परस्पर विरुद्ध गुणधर्म असेलेले पदार्थ असल्याने, त्याचे एकत्र सेवन करू नये. दह्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतो. तसेच त्यामुळे जेवणाची लज्जतही वाढते.

RELATED ARTICLES

Most Popular