28.1 C
Ratnagiri
Tuesday, May 21, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeIndiaआता पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा

आता पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा

पीएम किसान योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना या योजनबरोबरच, आता मासिक पेन्शनची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे

शासकीय नोकरी असेल तर त्या कर्मचार्यांना ठराविक कालावधीनंतर, निवृत्तीनंतर पेन्शन सुरु होते. निवृत्तीच्या वेळेला जेवढा पगार असेल त्याच्या काही पट पेंशन स्वरुपात मिळू शकते. परंतु, सध्याच्या काळात नोकऱ्या मिळणेच कठीण बनलेले आहे.

शेतकऱ्यांच सर्व आयुष्य जे काही शेतामध्ये वर्षभरामध्ये उगवते त्यावरच त्यांचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. त्यामुळे मोदी सरकारने पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी पेंशनची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची तरतूद असते. यासाठी वयोमर्यादा कमीत कमी १८ तर जास्तीत जास्त ४० वर्षापर्यंत कोणतेही शेतकरी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये एका वर्षात तीन टप्प्यांत विभागून देण्यात येतात.

पीएम किसान योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना या योजनबरोबरच, आता मासिक पेन्शनची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हजारांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ होणारअसून, नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रतिमहिना केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावर वयाच्या ६० वर्षांनंतर किमान तीन हजार रुपये किंवा वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे. यासाठी प्रतिमहिना गुंतवणूक ५५ रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत करावी लागणार आहे.

या मानधन योजनेमध्ये कौटुंबिक पेन्शनची देखील तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पैसे भरण्याची मर्यादा हि एका वर्षासाठी जास्तीत जास्त २४०० रुपये आणि कमीत कमी ६६० रुपये भरावे लागणार आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या पैशातून हे पैसे कपात करण्यात येतात.

RELATED ARTICLES

Most Popular