32.3 C
Ratnagiri
Tuesday, April 30, 2024

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची टीव्ही मालिकेत एंट्री

मागच्या वर्षी गणेशोत्सवात सोशल मीडियावर एक गाणं...

…तर रिक्षा चालकांचा मतदानावर बहिष्कार – प्रताप भाटकर

मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत...

डेंजरझोनमधील मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

पावसाचा हंगाम तोंडावर आला असला तरी डेंजरझोनमध्ये...
HomeChiplunचिपळूण बचाव समितीचे साखळी उपोषण अखेर स्थगित

चिपळूण बचाव समितीचे साखळी उपोषण अखेर स्थगित

आज चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणकरांनी पुकारलेल्या या लढ्याला निर्णायक यश प्राप्त झाले आहे.

चिपळुणात २२ जुलैला आलेल्या महापुराला वाशिष्ठी नदीतील गाळ हेच प्रमुख्य कारण असून प्रथम वाशिष्ठी गाळ मुक्त करा आणि त्यानंतरच लाल व निळी पूररेषा रद्द करा. यासाठी ६ डिसेंबर पासून प्रांत कार्यालयासमोर चिपळूण बचाव समितीने एकूण १० मागण्याच्या पूर्ततेसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. गेले २९ दिवस सुरु असलेल्या या आंदोलनातील चिपळूण बचाव समितीच्या सदस्यांची भेट घेण्यास अनेक राजकारणी, लोकप्रतिनिधी येऊन गेले. दुपारी २ वाजता कोकणचे मुख्य अभियंता विजय घोगरे चिपळूणात उपोषण स्थळी येत आहेत. मुख्य अभियंता विजय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणात वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मशीनरी आली आहे. शासनाने यासाठी खास अधिकाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.

या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना बचाव समितीचे अरुण भोजने म्हणाले कि, आज चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणकरांनी पुकारलेल्या या लढ्याला निर्णायक यश प्राप्त झाले आहे. गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. सुमारे ८० टक्के यंत्रसामुग्री वाशिष्ठी नदी किनारी दाखल झाली असून,  गोवळकोट ते बहादूरशेख नाका या पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

चिपळूणमध्ये जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, स्थानिक अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. त्याबरोबर चिपळूण बचाव समिती रोज पूर्ण होणाऱ्या कामाचा लेखाजोखा ठेवत, अधिकार्‍यांशी सल्ला मसलत सुरु आहे. सरकारने गाळ काढण्यासाठी संपूर्ण निधी देण्याची ग्वाही दिली आहे. गाळ काढल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करून लाल, निळ्या पूर रेषेबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन देखील देण्यात आले आहे. पर्जन्यमापक अत्याधुनिक व स्वयंचलित असावे,  ही मागणीही तिथे मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले चिपळूण बचाव समितीचे साखळी उपोषण अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular