29.2 C
Ratnagiri
Friday, May 17, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeMaharashtraपरिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी नोटीस

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये उसळलेल्या लाटेनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद, संघर्ष, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काही थांबण्याची लक्षणे दिसत नाही आहेत. काल राणेंची जन आशीर्वाद यात्रा संपली आणि आज शिवसेना नेते अनिल परब यांना ईडी नोटीस बजावण्यात आली. हा निव्वळ योगायोग सुद्धा असू शकतो, परंतु त्यावर सुद्धा सुरु असलेल्या राजकारणाला पेव फुटला आहे.

ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब पहिल्यांदाच माध्यमासमोर आले असून,  त्यावेळी त्यांनी आपल्याला ईडीनं नोटीस पाठवल्याचं मान्य केल आणि सांगितलं कि, ही नोटीस नक्की कशासाठी पाठवण्यात आली आहे, हे त्यात नमूद केलेलं नसून, ती नक्की कशाबद्दल आहे हे समजल्यावर त्यावर कायदेशीररित्या उत्तर पाठवलं जाईल.

परब म्हणाले, संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळालेली असून या नोटीसमध्ये कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. केवळ ईडी कार्यालयात ३१ तारखेला सकाळी ११ वाजता आपण हजर रहाव,  असं नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नक्की कशा संदर्भात ही नोटीस पाठविण्यात आलेली आहे,  हे मात्र मला आता सांगता येणार नाही.

अनिल परब यांना ईडी नोटीस पाठविणे, हे केंद्र सरकारच सुरु झालेलं षडयंत्र आहे. सूडाच्या राजकारणाचा तोटा भाजपलाच भोगायला लागणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्याचा उद्योग केंद्रानं बंद करावे. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही बसला नसून, असेच काहीतरी होणार हे ज्ञात होते. मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे कितीही नोटिसा पाठवा, आम्ही घाबरून जाऊन डगमगणारे नाही,  असा इशारा सेना खासदार विनायक राऊत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरळ भाजपला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular