27.9 C
Ratnagiri
Tuesday, May 21, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriरत्नागिरीत अंमली पदार्थविरोधीची तिसरी कारवाई

रत्नागिरीत अंमली पदार्थविरोधीची तिसरी कारवाई

दोघांकडून १ लाख १० हजाराच्या एकूण १६८ कागदी पुड्यांमधील ब्राऊन हेरॉईन व गांजा जप्त करण्यात आले आहे.

शहर आणि परिसरातून आठवडाभरात अंमलीपदार्थ विरोधी अनेक कारवाया झाल्या आहेत. यावरून शहराला अजूनही अंमली पदार्थाचा विळखा असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी (ता. ३) रात्री पुन्हा शिरगाव रोडवरील बंद भाजीच्या दुकानासमोर संशयास्पद आढळलेल्या दोघांकडून १ लाख १० हजाराच्या एकूण १६८ कागदी पुड्यांमधील ब्राऊन हेरॉईन व गांजा जप्त करण्यात आले आहे. याचा पुरवठा होतो कुठून, हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या मुख्य ठिकाणी असलेल्या रत्नागिरी शहरावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.

अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा श्वानपथकाद्वारे धडक मोहिमा राबवल्या. आठवडाभरात पोलिसांना रात्रीच्या गस्तीमध्ये संशयास्पद सापडणाऱ्या काही तरुणांकडे ब्राऊन हेरॉइन सापडले. दोन दिवसांपूर्वीच अशीच कारवाई करून १५५ ब्राऊन हेरॉइनच्या पुड्या सापडलेल्या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले होते. छोट्या छोट्या पुड्यांतून या अंमली पदार्थांची विक्री होत आहे. पोलिसांना कारवाईत या पुड्याच सापडत असल्याने अंमली पदार्थांची बिनधास्त विक्री होते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. शहर पोलिसांनी मंगळवारी पुन्हा शिरगाव येथील बंद असलेल्या भाजीच्या दुकानाच्या समोर दोन संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे १ लाख १० हजाराचे ब्राऊन हेरॉइन सापडले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काल रात्री परटवणे ते गणपतीपुळे जाणाऱ्या रोडवर बाणखिंड, शिरगाव येथील बंद असलेल्या भाजी सेंटरसमोरील महावितरणच्या पोलजवळ संशयित हुजेफा अब्दुल हमीद साखरकर याला ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन हा उग्र वासाचा अंमली पदार्थ सापडला तर संशयित मुसेब अब्दुल हमीद साखरकर यालाही ताब्यात घेतले.

त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ आढळला. त्याच्यावर अंमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ लाख १० हजार किंमतीचा एक पारदर्शक प्लास्टिक पाऊचमध्ये एकूण १६८ कागदी पुड्यांमधील खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉईन उग्र वासाचा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular